पुणे: पुण्यामध्ये म्हाडाचं घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळांतर्गत ४४६२ घरांची सोडत काढण्यात आलेल्या अर्जदारांना दिलासा आहे. या घराच्या सोडतीसाठी अनेक ग्राहकांकडून घर खरेदी करण्यासाठी फॉर्म भरला जात आहे. परंतु फॉर्म भरत असताना येणार्या अडचणी लक्षात घेत म्हाडा प्रशासनाने ऑनलाईन अर्जाच्या शेवटच्या तारखेमध्ये बदल केला आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला म्हाडा प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता लकी ड्रॉच्या तारखेतही बदल केला.
Sanjay Lathkar : मराठमोळे अधिकारी संजय लाठकर यांची अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती
मुंबई : मराठवाड्यातील संजय आनंदराव लाठकर यांच्यावर देशाच्या अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लातूरचे ...
गणेशोत्सवामुळे आणि अनेक ग्राहकांना अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा प्रशासनाने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लकी ड्रॉच्या तारखेमध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत इच्छुक ग्राहकांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर, पूर्वी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सोडत जाहीर करण्यात आली होती. परंतू आता २५ नोव्हेंबर २०२६ रोजी, सोडतीचा लकी ड्रॉ जाहीर करण्यात येणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्जाची रक्कम भरणार असाल तर त्यासाठी शेवटची तारीख १५ ऑक्टोबरच असणार आहे.
Maharashtra Water Shortage: राज्यावर ‘पाणीटंचाई’चे सावट, टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश
मुंबई: राज्यातील अनेक भागांत सप्टेंबरचा निम्म्याहून अधिक कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता ...
शिवाय, जे ग्राहक अर्जाची रक्कम आरटीजीएस (RTGS) किंवा एनईएफटी (NEFT) च्या माध्यमातून रक्कम भरणार आहेत, त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत ई- चलन घेणे आवश्यक असणार आहे. तर प्रत्यक्ष रक्कम भरण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर अर्जाची छाननी करून १२ नोव्हेंबर रोजी पात्र ग्राहकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर हरकती आणि सूचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २० नोव्हेंबरला पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. अखेर २५ नोव्हेंबरला घरांची संगणकीय सोडत पार पडेल. अद्याप सोडतीची वेळ आणि ठिकाण जाहीर करण्यात आलेले नाही.
Karjat- Panvel Railway Route: २९.६ किमी लांबीच्या कर्जत- पनवेल मार्गाचं ९९ टक्के काम पूर्ण, केव्हापासून मार्ग रेल्वे धावणार?
नवी मुंबई: कर्जत- पनवेलकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. कर्जतकरांना नवी मुंबईसाठी जाण्यासाठी मारावा लागणारा वळसा आता मारावा लागणार नाही. २९.६ ...
दरम्यान, सोडतीमध्ये १५ टक्के सामाजिक गृहनिमाण योजनेंतर्गत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी पुण्यातील येथील माांजरी खुर्द, म्हाळुंगे, भूगाव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.२० टक्के सर्वसमावेशक गृहनिमाण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबडेवाडी, मुंढवा, ऊंड्री, वडगाव, बावधन, कोंढवा खुर्द येथे सदनिका विक्री उपलब्ध आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिमाण योजनेंतर्गत पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, वाकड, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव येथे सदनिका विक्री उपलब्ध आहेत.