Ganeshotsav 2026 : मुंबईच्या इच्छापूर्ती मंडळात अवतरली कोकणातील 'ज्ञानाची पालखी'; बाप्पाच्या चरणी 'विद्या दानाचा' देखावा!

प्राची शिरकर


मुंबई : गणेशोत्सव म्हणजे केवळ भव्य देखावे आणि आरास नव्हे, तर 'श्रद्धेतून संस्कृती आणि संस्कृतीतून सेवा' हाच खरा विचार आहे, हे अँटॉप हिल येथील 'मुंबईचा इच्छापूर्ती गणपती मंडळाने' पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कोकणच्या मातीत रुजलेली आणि संस्कृतीचा वारसा जपणारी शिमगोत्सवाची पालखी यंदा इच्छापूर्ती मंडळाच्या रूपाने मुंबईत अवतरली आहे. मात्र, ही केवळ परंपरेची पालखी नसून, ग्रामीण भागातील चिमुकल्यांचे भविष्य उजळवणारी 'देवरूपी ज्ञानाची पालखी' ठरली आहे.



'एक साडी, एक सन्मान' नंतर आता 'विद्या दानाचा' ध्यास



सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इच्छापूर्ती मंडळाने गेल्या वर्षी “एक साडी, एक सन्मान” या उपक्रमाद्वारे ८०० हून अधिक गरजू महिलांना सन्मानित केले होते. याच सेवाभावाची पुढची पायरी म्हणून यंदा मंडळाने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि उज्ज्वल भविष्याची आशा देण्याचा दृढ संकल्प केला आहे.


?si=C-21pID2x2KzmFNF

सजावट म्हणजे देखावा नाही, तर सेवेचा मार्ग


">मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपला वेळ, मेहनत, कला आणि कल्पकता पणाला लावून ही अनोखी संकल्पना साकारली आहे. "आमच्यासाठी सजावट म्हणजे केवळ डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा नाही, तर कलेतून संस्कृती जपायची, संस्कृतीतून सेवा करायची आणि याच सेवेतून देशाचे भविष्य घडवायचे हा आमचा ध्यास आहे," अशी भावना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.



बाप्पाच्या आराधनेची नवी व्याख्या


श्रींचे पूजन केवळ फुले आणि नैवेद्य अर्पण करूनच नाही, तर एखाद्या गरजू आणि होतकू मुलाच्या हातात पुस्तक टेकवूनही करता येते, हा सुंदर संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. कोकणी संस्कृतीची ओळख, परंपरेचा आदर आणि त्याला जोडलेली शिक्षणाची कास यामुळे अँटॉप हिलच्या इच्छापूर्ती मंडळाची ही 'ज्ञानाची पालखी' सध्या संपूर्ण मुंबईकरांच्या कौतुकाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Tags
mumbai ganeshotsavmarathi news videoMumbai Ganpati festivalBappa MoryaViral Ganpati DekhavaGanesh Utsav MumbaiUnique Ganpati DekhavaIchhapurti Mandal MumbaiIchhapurti Ganpati dekhavaKonkan Dnyanachi PalkhiVidya Dan Ganpati dekhavaKonkan culture GaneshotsavLalbaug Ganpati updates
Comments
Add Comment

Lalbaugcha Raja eco friendly plates : लालबागच्या राजाचा प्रसाद आता 'इको-फ्रेंडली' ताटात; प्लास्टिकला फाटा देत १,५८० किलो कार्बन उत्सर्जन रोखले

मुंबई : 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) चरणी लीन होणाऱ्या लाखो भाविकांसाठी यंदा एक अत्यंत स्तुत्य आणि

Ganeshotsav 2026 : “स्वच्छ मुंबईचे खरे शिल्पकार - आपले सफाई कर्मचारी!”

सफाई कर्मचाऱ्यांना पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अनोखी मानवंदना! कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील यांची

Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ वर्षांच्या 'बिजली' वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू!

मुंबई : बोरीवली येथील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (Sanjay Gandhi National Park) एक दुःखद बातमी समोर आली आहे. २०१६

BMC News : महापालिका आयुक्तांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त लावले राणीबागेत ‘सेंच्युरी पाम’

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियान अंतर्गत आणि

Mumbai Police Mounted Unit : मुंबई पोलिसांचे ऐतिहासिक 'घोडदळ' पुन्हा सेवेत; गणेशोत्सवात चौपाट्यांवर सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या पाहता १९३२ मध्ये बंद करण्यात आलेले मुंबई पोलिसांचे विशेष

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे, अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस

न्यायालयीन लढ्याला राजकीय ठरवण्याचा डाव असल्याचा सतीश सालियन यांचा आरोप; सात दिवसांत माफीची मागणी मुंबई :