मुंबई : 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) चरणी लीन होणाऱ्या लाखो भाविकांसाठी यंदा एक अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहे. बाप्पाच्या दर्शनानंतर भाविकांना मिळणारा प्रसाद (भोग) आता १०० टक्के नैसर्गिकरीत्या विघटन होणाऱ्या (Biodegradable) ताट-वाट्यांमध्ये दिला जात आहे. सिंगल-यूज प्लास्टिकला पूर्णपणे फाटा देण्यासाठी मंडळाने हे पाऊल उचलले आहे.
उसाच्या चोथ्यापासून तयार केल्या ताट-वाट्या
गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक मूर्ती आणि नैसर्गिक साहित्याच्या वापरावर विशेष भर दिला जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून लालबागच्या राजाच्या प्रसादासाठी 'चक' (CHUK) या ब्रँडच्या इको-फ्रेंडली ताट-वाट्यांचा वापर केला जात आहे. ही भांडी उसाचा रस काढल्यानंतर उरणाऱ्या चोथ्यापासून (बगॅस - Bagasse) तयार केली जातात. ही भांडी वापरून फेकून दिल्यानंतर काही दिवसांतच मातीत पूर्णपणे मिसळून जातात.
मुंबई : मराठवाड्यातील संजय आनंदराव लाठकर यांच्यावर देशाच्या अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लातूरचे ...
पर्यावरणाला मोठा दिलासा
इतर मंडळांनीही हा आदर्श घ्यावा
"लालबागच्या राजासारख्या अथांग लोकसंख्या आणि प्रचंड गर्दी असलेल्या उत्सवात अशा पर्यावरणपूरक भांड्यांचा वापर होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे हजारो टन प्लास्टिक कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचतो आणि पुन्हा मातीत मिसळतो. इतर गणेशोत्सव मंडळांनीही प्लास्टिकला फाटा देत हाच मार्ग स्वीकारावा," असे पक्का लिमिटेडच्या 'चक' विभागाचे प्रमुख शुभम तिब्रेवाल यांनी स्पष्ट केले.
राम मंदिर अन् महाकुंभातही याच ताटांचा वापर
विशेष म्हणजे, यापूर्वी अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रसादाच्या वितरणासाठी याच कंपनीच्या इको-फ्रेंडली ताट-वाट्यांचा वापर करण्यात आला होता. याशिवाय माता वैष्णोदेवी मंदिर, प्रयागराज येथील महाकुंभमेळा आणि पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेसारख्या देशातील मोठ्या धार्मिक सोहळ्यांमध्येही या पर्यावरणपूरक भांड्यांचा यशस्वी वापर झाला आहे.