Jalgaon Gold Silver Rate : गणेशोत्सवाच्या काळात जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. सलग दोन दिवस दरवाढ झाल्यानंतर गुरुवारी सकाळी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात अचानक घसरण झाली. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरात जवळपास 2 हजारांची घट
जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी दिवसभरात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,545 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे तीन टक्के जीएसटीसह सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,57,281 रुपयांवर पोहोचला होता. मात्र, गुरुवारी सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात 1,751 रुपयांची घट नोंदवण्यात आली. त्यामुळे तीन टक्के जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,55,530 रुपयांवर आला.
मुंबई : 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) चरणी लीन होणाऱ्या लाखो भाविकांसाठी यंदा एक अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहे. ...
चांदीही स्वस्त; 3 हजारांची घसरण
चांदीच्या दरातही बुधवारी मोठी वाढ झाली होती. दिवसभरात चांदीच्या दरात 3,090 रुपयांची वाढ झाल्याने तीन टक्के जीएसटीसह चांदीचा दर प्रति किलो 2,41,020 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, गुरुवारी सकाळच्या व्यवहारात चांदीच्या दरात पुन्हा 3,090 रुपयांची घट झाली. त्यामुळे जीएसटीसह चांदीचा दर प्रति किलो 2,37,930 रुपयांवर आला.
अमेरिकेतील फेडच्या निर्णयाचा परिणाम
जागतिक बाजारातील हालचालींचाही भारतीय बुलियन बाजारावर परिणाम होत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरविषयक निर्णयानंतर डॉलर आणि अमेरिकी रोख्यांच्या उत्पन्नात झालेल्या हालचालींमुळे सोने-चांदीच्या दरात अस्थिरता वाढली आहे. 15-16 सप्टेंबर रोजी झालेल्या FOMC बैठकीनंतर फेडरल फंड्सचा लक्ष्य दर 3.75 ते 4 टक्के या पातळीवर नेण्यात आला. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव दिसून आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. काही टप्प्यांवर सोन्याचा दर 4,300 डॉलरच्या आसपास आला. चांदीच्या दरातही दबाव दिसून आला. दरम्यान, पुढील काळात सोने-चांदीचे दर कोणत्या दिशेने जातील, यावर अमेरिकेतील व्याजदर, डॉलरची स्थिती आणि महागाईची आकडेवारी यांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.