मुंबई: अवघ्या सव्वा दोन वर्षांच्या चिमुकलीच्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी तिच्या आई-वडिलांची सुरू असलेली धडपड अत्यंत हेलावून टाकणारी आहे. SMA Type-2 (स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी) या दुर्मिळ आजाराशी झुंजणाऱ्या दोन वर्षे दहा महिन्यांच्या श्रीनिकाच्या पालकांनी मंत्रालयात जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्र्यांनी अत्यंत संवेदनशील भूमिका दाखवत श्रीनिकाच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.(Rare Disease Child)
१० कोटींच्या उपचारखर्चाचे मोठे आव्हान
रामटेक येथे राहणाऱ्या श्रीनिकाच्या वडिलांचे एक लहानसे भांड्याचे दुकान आहे. ही गोड आणि निरागस चिमुकली सर्वसाधारण मुलांप्रमाणे रांगत नसल्याने जेव्हा तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तेव्हा तिला SMA Type-2 या अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर आजाराने ग्रासल्याचे निष्पन्न झाले. तिच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी आणि तिला निरोगी जीवन मिळवून देण्यासाठी एक अत्यंत महागडे इंजेक्शन टोचावे लागणार आहे, ज्याची किंमत दहा कोटी रुपये आहे. एवढा प्रचंड खर्च करणे एका सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेर आहे. या चिमुकलीवर मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत.
अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे नगरकरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ...
मंत्रालयातील भावूक भेट आणि मंत्र्यांची संवेदनशीलता
आई शिवानी, वडील रोहित आणि काका निखिल यांनी श्रीनिकाला खांद्यावर घेऊन मंत्रालयातील महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे दालन गाठले. त्यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल हे देखील उपस्थित होते. दुर्मिळ आजाराने पीडित असलेली ही निरागस चिमुकली दालनात उपस्थित सर्वांना हसतहसत हात हलवून प्रतिसाद देत होती, तर कधी कोणाचा हात पकडत होती.
राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी सोबत आणलेल्या फाईलमधील एकेक वैद्यकीय कागदपत्र महसूल मंत्र्यांसमोर मांडले. मुलीची प्रकृती, आजाराचे स्वरूप आणि उपचारासाठी लागणाऱ्या प्रचंड खर्चाची माहिती दिली. या प्रसंगी एका कुटुंबाची असहायता आणि आई-वडिलांची जीवघेणी झुंज पाहून महसूल मंत्री बावनकुळे यांनी या परिस्थितीकडे केवळ एक शासकीय प्रकरण म्हणून न पाहता माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला.(SMA Type-2)
शासन स्तरावर तातडीने पावले उचलण्याचे निर्देश
मंत्री बावनकुळे यांनी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्याशी चर्चा करून सरकार, महापालिका, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री सहायता निधी या सर्व शक्यता तपासल्या. तसेच काही संबंधित अधिकाऱ्यांशी तत्काळ दूरध्वनीवरून संवाद साधत जलद पावले उचलण्याचे निर्देश दिले.(SMA Type-2)
औली (उत्तराखंड) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘युद्ध अभ्यास २०२६’ सध्या चर्चेत आला आहे. उत्तराखंडमधील औली येथे सुरू असलेल्या या ...
यावेळी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, "ही आपल्या संवेदनशीलतेची कसोटी आहे. एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणी त्यांना केवळ नियम-कायद्यांची भाषा न ऐकवता मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. समाजानेही या चिमुकलीला सहृदयतेने पुढे येऊन मदत केली पाहिजे." श्रीनिकाला आपल्या आई-वडिलांच्या हाताला धरून चालायचे आहे, खेळायचे आहे आणि बालपण जगायचे आहे. तिच्या या छोट्याशा इच्छेपुढे १० कोटी रुपयांचा आकडा प्रचंड असला, तरी तिच्या पालकांची जगण्याची आशा त्याहून मोठी असल्याचे त्यांनी नमूद केले. या मदतीच्या आश्वासनामुळे या दुःखी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.(SMA Type-2)