Friday, September 18, 2026

Crime News : फ्रीजमध्ये ५ वर्षांच्या लेकीचा मृतदेह, वडिलांची आत्महत्या; खोलीत फुगे, मेणबत्त्या अन् ३ सुसाइड नोट्स... नेमकं प्रकरण काय?

Crime News : फ्रीजमध्ये ५ वर्षांच्या लेकीचा मृतदेह, वडिलांची आत्महत्या; खोलीत फुगे, मेणबत्त्या अन् ३ सुसाइड नोट्स... नेमकं प्रकरण काय?
अमरेली : गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे एका वडिलांनी आपल्या ५ वर्षीय मुलीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४० वर्षीय किशोर धनक यांनी मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला आणि त्यानंतर स्वतःचे आयुष्य संपवल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी तीन सुसाइड नोट्स, फुग्यांची सजावट, मेणबत्त्या आणि ‘हॅप्पी बर्थडे हिमांशी’ असा कागद आढळल्याने या प्रकरणाला आणखी गंभीरस्वरूप प्राप्त झाले आहे. (Crime News)

काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर धनक हे कन्स्ट्रक्शन साइटवर सुपरवायजर म्हणून काम करत होते. बुधवारी ते आपल्या ५ वर्षीय मुलीसोबत घरी आले. त्यानंतर त्यांनी मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. काही वेळाने किशोर यांनीही आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. (Crime News)

आर्थिक अडचणींमुळे टोकाचं पाऊल?

किशोर यांच्या खोलीत सापडलेल्या सुसाइड नोट्समधून आर्थिक अडचणींचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. किशोर यांनी पर्सनल लोन घेतले होते आणि ही रक्कम बांधकामाच्या कामात वापरली होती. मात्र, मित्रांकडून कथित फसवणूक झाल्याने त्यांना अपेक्षित पैसे मिळाले नसल्याचे चिठ्ठीत नमूद असल्याची माहिती आहे. (Crime News) किशोर यांच्या पत्नी मंजुबेन यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, किशोर यांना ७ लाख २५ हजार रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पैसे दिले नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली होती. कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत ते होते.

मुलीची हत्या का केली?

पोलिसांच्या माहितीनुसार, एका सुसाइड नोटमध्ये किशोर यांनी मुलीच्या हत्येचे कारणही नमूद केले आहे. स्वतःच्या मृत्यूनंतर मुलीला त्रास होऊ नये, या विचारातून तिची हत्या केल्याचा उल्लेख चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Crime News) तिसऱ्या चिठ्ठीत माफी मागण्यात आली असून, मुलीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे.

खोलीत फुगे, मेणबत्त्या अन् ‘हॅप्पी बर्थडे हिमांशी’ लिहिलेला कागद...

घटनास्थळी पोलिसांना काही असामान्य बाबी आढळल्या. मुलीला पांढरे कपडे घातले होते आणि तिच्या डोक्यावर दुपट्टा ठेवण्यात आला होता. खोलीत फुग्यांची सजावट आणि मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. फ्रीजमध्येही मुलीचा मृतदेह कापडात गुंडाळून ठेवण्यात आला होता. तिच्या ओठात तुळशीची पाने होती, तर खोलीत आणि फ्रीजमध्ये चॉकलेट्स ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. (Crime News)
फ्रीजवर ‘हॅप्पी बर्थडे हिमांशी’ असा कागदही आढळला. मात्र, त्या दिवशी मुलीचा वाढदिवस नव्हता. त्यामुळे किशोर यांनी मुलीचा शेवटचा वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने ही तयारी केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगण्यात आले आहे. (Crime News)

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुसाइड नोट्स, आर्थिक व्यवहार, किशोर यांचे सहकारी आणि कर्जाशी संबंधित बाबींचा तपास केला जात आहे. या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि आर्थिक व्यवहारांची साखळी स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Crime News)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >