Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील धोकादायक भोस्ते घाटात केमिकलने भरलेला टँकर भीषण अपघातात दरीत कोसळला. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला असून, त्याची रसायनाने भरलेली मुख्य टाकी गाडीपासून वेगळी होऊन तब्बल २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळली. टाकीत धोकादायक व ज्वलनशील रसायन असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात असून, संभाव्य केमिकल गळतीमुळे भोस्ते गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Mumbai Goa Highway)
काय घडलं?
मुंबई-गोवा महामार्गावरून केमिकलने भरलेला टँकर खेडच्या दिशेने जात असताना भोस्ते घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर टँकर रस्त्यावरून पलटी झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, टँकरची मुख्य रसायनाची टाकी वाहनापासून वेगळी झाली आणि थेट दरीत कोसळली. (Mumbai Goa Highway)
तब्बल २५ हजारांहून अधिक अधिकारी,कर्मचाऱ्यांचा फौजफाटा एकूण ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे बुजवले यंदा ‘एक गणपती, एक झाड’ उपक्रम मुंबई (विशेष ...
२५० फूट खोल दरीत टाकी
दरीत कोसळलेली टाकी सुमारे २०० ते २५० फूट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे. या टाकीत नेमके कोणते रसायन आहे, त्याची मात्रा किती आहे आणि त्यातून गळती होत आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे.
केमिकल गळतीची भीती
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, टाकीत अत्यंत घातक आणि ज्वलनशील केमिकल असल्याची शक्यता आहे. त्यामुळे टाकीतून रसायनाची गळती झाल्यास विषारी वायू किंवा रसायनाचा परिसरात प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरीच्या खाली असलेल्या भोस्ते गावातील नागरिकांमध्ये त्यामुळे चिंता वाढली आहे. (Mumbai Goa Highway)
येत्या १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवणार मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक महापालिका आयुक्तांनी ...
बचाव पथकं घटनास्थळी
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस, महामार्ग पोलीस, अग्निशामक दल आणि स्थानिक आपत्कालीन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच दरीतील परिस्थितीची पाहणी सुरू आहे.
रसायन नेमकं कोणतं?
टँकरमध्ये नेमके कोणते रसायन होते आणि त्याचा मानवी आरोग्य तसेच पर्यावरणावर किती परिणाम होऊ शकतो, याची माहिती घेण्यासाठी तज्ज्ञांकडून तपास केला जात आहे. दरीत कोसळलेली टाकी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तसेच संभाव्य गळती रोखण्यासाठी विशेष यंत्रणा तैनात करण्याची तयारी सुरू आहे. (Mumbai Goa Highway)
नवी दिल्ली : माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेलेला ३१ वर्षीय एचआर व्यावसायिक युवराज सिंग मनचंदा बेपत्ता झाल्यानंतर त्याची कथित हत्या ...
जीवितहानीबाबत तपास सुरू
भोस्ते घाटातील अवघड वळणांमुळे याठिकाणी यापूर्वीही अपघात घडले आहेत. या अपघातात नेमकी जीवितहानी झाली आहे का, तसेच चालकाची स्थिती काय आहे, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Mumbai Goa Highway)






