मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह (Ganeshotsav 2026) शिगेला पोहोचला असून शहरातील अनेक दिग्गज मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाने नुकतीच लालबागच्या राजाच्या दरबारात (Lalbuagcha Raja 2026) हजेरी लावली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले, तसेच महाआरतीमध्येही भाग घेतला.
अंबानी कुटुंब राजाच्या चरणी नतमस्तक (Ganeshotsav 2026)
मुकेश अंबानी अन् अनंत-राधिकाचा पारंपरिक लूक ठरला आकर्षक (Ganeshotsav 2026)
या धार्मिक प्रसंगी मुकेश अंबानी यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्तात-पायजमा आणि त्यावर नेव्ही ब्लू रंगाचे नेहरू जॅकेट परिधान केले होते. तर अनंत अंबानी यांनी नारंगी रंगाचा सुरेख कुर्ता आणि त्यावर सुंदर एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट घातले होते. दुसरीकडे, राधिका मर्चंटने बेबी-ब्लू रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला कुर्ता आणि गुलाबी पायजमा असा साधा पण आकर्षक पोशाख निवडला होता. राधिकाने अतिशय हलके दागिने घातले होते आणि ती कोणत्याही मेकअपशिवाय अगदी नैसर्गिक रूपात दिसली.
गणेशोत्सवात अनंत अंबानींची लालबागच्या राजाला दुसरी भेट (Ganeshotsav 2026)
गणेशोत्सव २०२६ दरम्यान अनंत अंबानी यांची लालबागच्या राजाच्या दरबारातील ही पहिली भेट नव्हती. याआधी उत्सव सुरू असताना त्यांनी बुधवारी, १७ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी लाल रंगाच्या कुर्त्यात आलेल्या अनंत अंबानींनी भाविकांच्या प्रचंड गर्दीत बाप्पाच्या चरणी माथा टेकवून प्रार्थना केली होती.