BMC health report : मुंबईत यंदा मलेरियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ; डेंग्यू-चिकुनगुनियाला मात्र आळा पालिकेचा अहवाल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई यंदा मलेरियाच्या आजाराने डोकेवर काढले असून मागील वर्षीच्या ९ महिन्यातील आजारांच्या तुलनेत या वर्षीच्या ९ महिन्यांत मलेरियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षीच्या जाने ते १५ सप्टेंबर २०२५मधील ६,२७७ रुग्णांच्या तुलनेत यंदाच्या या कालावधीत ८,७२३ रुग्ण आढळले आहेत. तर जून ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५,९८४ एवढे मलेरियाचे रुग्ण होते. दुसरीकडे, डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि कोविड-१९ या आजारांच्या रुग्णसंख्येत मात्र घट झाल्याचे दिसून येते.(Mumbai BMC health report)


मुंबई महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या पावसाळाजन्य आजारांच्या मासिक तुलना अहवालानुसार, यंदा जानेवारी ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मलेरियाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या ६,२७७ रुग्णांच्या तुलनेत यंदा ८,७२३ रुग्ण आढळले आहेत. तर जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये ४३०४ मलेरियाचे रुग्ण होते आणि आणि जून ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीमध्ये ५९८४ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत.



महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेक्टर नियंत्रण कार्यवाहीअंतर्गत मलेरिया नियंत्रणासाठी २१,६६५ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ३,३६७ ठिकाणी अ‍ॅनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळली. डेंग्यू नियंत्रणासाठी ४ लाख ६८,९९३ उत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात आली असून ११,७७६ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळली. यादरम्यान ६६९ जुने टायर आणि २२,३४४ भंगार वस्तू काढून टाकण्यात आल्या. तसेच २०,७२३ इमारत परिसरांत व ३,२९,७१६ झोपड्यांमध्ये धूरफवारणी करण्यात आली.(Mumbai BMC health report)


अहवालानुसार डेंग्यूचे रुग्ण गेल्या वर्षीच्या २,७२४ वरून यंदा २,६४६ पर्यंत घटले आहेत, तर चिकुनगुनियाचे रुग्ण ५४२ वरून थेट ८० पर्यंत खाली आले आहेत. लेप्टोस्पायरोसिसचे प्रमाणही ५५८ वरून ३९० पर्यंत कमी झाले आहे. मात्र एच१एन१च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली असून, ती ८३ वरून ५०७ पर्यंत पोहोचली आहे.(Mumbai BMC health report)


ध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व प्रभागांमध्ये विविध सार्वजनिक आरोग्य जनजागृती उपक्रम हाती घेतले आहेत. गणेश मंडळांना 'आयईसी' भित्तिपत्रकांचे वाटप करण्यात आले असून, मलेरिया व डेंग्यू याबाबत जनजागृतीपर जिंगल्सही वाजवली जात आहेत. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पालिकेने ५ लाख ९४ हजार २६९ घरांचे सर्वेक्षण करून २७ लाख ९३ हजार १९३ नागरिकांची तपासणी केली. या काळात ३२,११४ रक्तनमुने घेण्यात आले, तर लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार ९,८४२ नागरिकांना देण्यात आले. आरोग्य विभागाने नागरिकांना घर व परिसरात पाणी साचू न देण्याचे, जुने टायर-टाक्या-भंगार वस्तू साठवून न ठेवण्याचे आणि दिवसा-रात्री मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.(Mumbai BMC health report)


महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अहवाल


| आजार | २०२५ | २०२६ |


| मलेरिया | ६,२७७ | ८,७२३ |


| डेंग्यू | २,७२४ | २,६४६ |


| चिकुनगुनिया | ५४२ | ८० |


| लेप्टो | ५५८ | ३९० |


| गॅस्ट्रो | ५,९८९ | ४,९९७ |


| एच१एन१ | ८३ | ५०७ |


| कोविड-१९ | १,११८ | १७८ |

Comments
Add Comment

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकावर काळाचा घाला; रांगेतच प्राण सोडल्याने हळहळ

मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत आहेत. मात्र,

IoT Water Meter : पाण्याची हातोहात होणारी चोरी येणार उघड; टँकर भरणा केंद्रावर बसवणारी आयओटी आधारीत इनलाइन अल्टासॉनिक जलमापके

प्रत्येक नोंदीची माहिती एक्वा सर्व्हरला मिळणार त्वरीत मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिकेच्या विविध ठिकाणी

GSB Ganpati Visarjan 2026 : मुंबईतील सर्वात महागड्या गणपतीचे विसर्जन; जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप!

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत गणपतींपैकी एक असलेल्या किंग्ज सर्कल येथील GSB सेवा मंडळाच्या गणपतीचे

Mumbai-Pune Expressway: २७ वर्षांनंतरही खड्डेमुक्त महामार्गाचा गडकरींचा दावा; वाढत्या वाहतुकीसाठी १० लेनचा पर्याय चर्चेत!

मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

BEST Bus Accident : पादचाऱ्यांना वाचवण्यासाठी चालकाचा ब्रेक; मानखुर्दमध्ये बस मेट्रोच्या खांबावर आदळली, प्रवासी जखमी

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या चार

Ganpati Visarjan 2026: गणपती विसर्जनासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर २२ जादा लोकल फेऱ्या, एका क्लिकवर जाणून घ्या टाईम टेबल

मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करून रात्री उशिरापर्यंत घरी परतणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य