Nashik News : 8 महिन्यांची चिमुकली बेपत्ता, संशयिताची आत्महत्या; आता आजोबाही गायब, नांदगाव प्रकरणाचं गूढ वाढलं

Nashik News : नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी परिसरातील बाभुळवाडी येथून आठ महिन्यांची चिमुकली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं आहे. मध्यरात्री घरातून चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, तपासादरम्यान एका संशयिताचा मृत्यू आणि आता चिमुकलीचे आजोबाही बेपत्ता असल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे.



मध्यरात्री चिमुकली बेपत्ता


17 तारखेच्या मध्यरात्री आठ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. घराच्या परिसरात तसेच आसपासच्या भागात तिचा शोध घेण्यात आला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही चिमुकलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर नांदगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. चिमुकलीचा शोध घेण्यासाठी परिसरातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. (Nashik Crime News)



संशयिताची चौकशी अन् त्यानंतर मृत्यू


या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी एका इसमाची संशयित म्हणून चौकशी केली होती. चौकशीनंतर या इसमाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर आधीच गुंतागुंतीच्या बनलेल्या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं.



आता आजोबाही बेपत्ता


दरम्यान, बेपत्ता चिमुकलीच्या आई-वडिलांनी तिच्या आजोबांवर संशय व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यातच चिमुकलीचे आजोबाही बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा आणखी बदलली असून, या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. मात्र, आजोबांचा चिमुकलीच्या बेपत्ता होण्याशी संबंध असल्याचं अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक शक्यता तपासली जात आहे. (Nashik Crime News)



चिमुकलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास


चिमुकलीचं अपहरण झालं आहे का, ती कुठे आहे, तिच्यासोबत नेमकं काय घडलं आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. उपलब्ध माहिती, परिस्थितीजन्य पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या चौकशीच्या आधारे तपासाची चक्रं फिरत आहेत. एकीकडे आठ महिन्यांच्या चिमुकलीचा शोध सुरू असताना दुसरीकडे संशयिताचा मृत्यू आणि आजोबांचं बेपत्ता होणं यामुळे नांदगावमधील या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढलं आहे. आता पोलिसांच्या तपासातून चिमुकलीचा शोध लागतो का आणि या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य काय आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Ranveer- Deepika 2nd Baby Girl: रणवीर- दीपिकाच्या घरी पुन्हा गौराईचं आगमन, बॉलिवूड कपल दुसऱ्यांदा झाले आई- बाबा

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. दीपिकाने एका

Chakan FDA gutkha raid news : चाकणमध्ये एफडीएची धडाकेबाज कारवाई; ६ तासांच्या थरारक पाठलागानंतर १.१३ कोटींचा गुटखा जप्त!

बदलेला प्रवास मार्ग, चकवा देण्याचा प्रयत्न, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा ६ तासांचा थरारक पाठलाग आणि रात्रभर

Nitesh Rane : संजय राऊत जितके बोलतील, तितक्या लवकर आदित्य ठाकरेंना अटक होईल!

- मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवलीतील कथित खुनांची चौकशी का केली

Mumbai Metro Accident: मेट्रोच्या बांधकामावेळी विक्रोळीत आणखी एक बळी, लोखंडी बॅरिकेट अंगावर पडून एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील विक्रोळीमध्ये मेट्रोच्या कामावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रोळीतील

Jalgaon : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिला अन्... जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लालबागच्या

लोहगड हत्याकांड : २५०० पानांचे चार्जशीट दाखल! पोलिसांचा तपास पूर्ण, कोर्टात धक्कादायक पुरावे सादर

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर घडलेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) यांच्या हत्येच्या प्रकरणाला