Raigad Crime : रायगड हादरले! अल्पवयीन मुलीवर नराधमांचा अत्याचार; नेरळ पोलिसांच्या तत्परतेमुळे दोघे जाळ्यात

रायगड : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणात नेरळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.(Raigad Crime)



नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, मौजे हजारे नगर (नेरळ) येथील ‘भोपेले लक्ष्मी कॅस्टीलो’ या इमारतीच्या 'सी' विंगमधील रूम नंबर ४०६ (चौथा मजला) येथे अल्पवयीन पीडित मुलगी तिच्या दोन मित्रांसोबत (आरोपी क्र. १ व २) राहत होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असतानाही, दोन्ही आरोपींनी तिच्याशी शारीरिक लगट केली. तसेच, तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या नृशंस अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय व पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.(Raigad Crime)



पोलिसांची कठोर कारवाई आणि गुन्हा दाखल



घटनेचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून नेरळ पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि दोन्ही संशयित आरोपींना जेरबंद केले. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०९/२०२६ नुसार खालीलप्रमाणे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे:





  • भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३: कलम ६४, ६४(२)(एफ), ६५(१), ७४, ७९, आणि ३(५)




  • पॉक्सो (POCSO) कायदा, २०१२: कलम ४, ६, ८ आणि १२




या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक (पोसई) वरक करत आहेत. अल्पवयीन मुलीवरील या अत्याचाराच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.(Raigad Crime)

Comments
Add Comment

Ahilyanagar News : पतीच्या शिक्षिकेसोबतच्या संबंधाच्या संशयातून पत्नी थेट शाळेत, पुढे घडले असे काही की...

Ahilyanagar News : पती आणि प्राथमिक शिक्षिकेतील कथित जवळकीच्या संशयातून संतप्त झालेल्या पत्नीने थेट शाळेत जाऊन शिक्षिकेला

Jalgaon Cotton Rate : जळगावात कापसाला हंगामाच्या सुरुवातीलाच 8,500 रुपये भाव, दरवाढीची शक्यता

Jalgaon Cotton Rate : जळगाव जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामाला सुरुवात झाली असून, जिनिंग आणि बाजार समित्यांमध्ये

Chhatrapati Sambhajinagar Crime : संचालकांच्या मुलीचा फोटो DP वर ठेवला अन् अकाउंटंटकडून दीड तासात 3.70 कोटींचा व्यवहार केला ; सायबर ठगांचा नवा फंडा समोर

Chhatrapati Sambhajinagar Crime : सायबर ठगांनी फसवणुकीसाठी आता ओळखीच्या व्यक्तींच्या फोटोचाही गैरवापर सुरू केल्याचे समोर आले आहे.

Nashik Road Jail Gangwar : नाशिकरोड कारागृहात 10 ते 12 कैद्यांचा न्यायाधीन बंदीवर हल्ला, भाईगिरीला आळा कधी ?

Nashik Road Jail Gangwar : सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Central Jail)

IIT Bombay Student Death : परीक्षेदरम्यान चॅटजीपीटी वापरल्याचा प्रकार; विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये आंदोलन

मुंबई : मुंबईतील पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय

Disha Salian Case : सतीश सालियन मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दिशा सालियन