प्रत्येक नोंदीची माहिती एक्वा सर्व्हरला मिळणार त्वरीत
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या भरणा केंद्रांवर टँकरद्वारे पाणी भरले जात असून आजवर याठिकाणी दिवसाला किती टँकरमध्ये किती लिटर पाणी भरले याची अचूक नोंद ठेवली जात नव्हती. अशाप्रकारची नोंद ठेवणारी जलमापकेच काही ठिकाणी बंद असल्याने महापालिकेला टँकरमधून गेलेल्या पाण्याची माहिती मिळत नव्हती. परंतु आता महापालिकेच्या सर्व टँकर भरणा केंद्रांवर आयओटी आधारीत इनलाइन अल्टासॉनिक जलमापके बसवली जाणार आहे. त्यामुळे किती पाणी टँकरमध्ये भरले गेले आणि किती टँकरमधून पाणी नेले गेले याची एकत्रित माहिती महापालिकेच्या नियोजन व नियंत्रण विभागाला, तसेच एक्वा सर्व्हरला दैनंदिन स्वरुपात प्राप्त होणार असल्याने पाण्याची होणारी चोरी आता हातोहात पकडता येणार आहे.(IoT Water Meter)
महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या निर्देशानुसार,शहर, पश्चिम व पुर्व उपनगरे येथील सर्व टँकर फिलिंग पॉइंटवर जलमापक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सन २०१९ मध्ये ८० मिमी व १०० मिमी आकाराचे एकूण ६४ यांत्रिक जलमापके खरेदी करून बसविण्यात आले. सुमारे सहा वर्ष हि जलमापके सुस्थितीत कार्यरत आहेत. या जलमापकांद्वारे टँकरमध्ये वितरीत केलेल्या एकूण पाण्याच्या मोजमापाची नोंद स्थानिक जलाशयाच्या रजिस्टर मध्ये घेतली जात आहे.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत गणपतींपैकी एक असलेल्या किंग्ज सर्कल येथील GSB सेवा मंडळाच्या गणपतीचे आज, १९ सप्टेंबर रोजी विसर्जन होत आहे. ...
पण सन २०२६ च्या उन्हाळ्यात, पाणी साठ्यात कमी पाणी उपलब्ध झाल्यामुळे व पाण्याचा तुटवडा झाल्यामुळे, नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवली. त्यामुळे बहुतेक नागरिक टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणा-या पाण्यावर अवलंबून होते. फेब्रुवारी ते मे २०२६ या काळात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात आढळून आला. या पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थापन करण्याकरीता, या टँकर भरणा केद्रांवरुन किती प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो, याची एकत्रित माहिती महापालिकेच्या नियोजन व नियंत्रण विभागाला, तसेच एक्वा सर्व्हरला दैनंदिन स्वरुपात उपलब्ध असणे आवश्यक होते. परंतु, २०१९ साली बसविलेल्या यांत्रिक जलमापकांमध्ये, अशा पदधतीची यंत्रणा उपलब्ध नाही.
त्यामुळे सक्षम जल वितरण व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने, दैनंदिन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणा-या पाण्याच्या प्रमाणाबाबत महापालिकेच्या नियोजन व नियंत्रण विभागाला व एक्चा सर्व्हरला दैनंदिन माहिती उपलब्ध असावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सध्याच्या परिस्थितीत इंटरनेट ऑफ थिंग्स ( आयओटी) आधारीत अल्ट्रासॉनिक जलमापकांद्वारे प्रत्येक पंधरा मिनिटाला टँकर भरणा केंद्रांवरून महापालिकेच्या एक्वा सर्व्हरला वितरीत करण्यात आलेल्या पाण्याची माहिती मिळणे शक्य आहे. त्याअनुषंगाने, सातत्याने निरीक्षण करण्याकरिता शहर, पश्चिम व पूर्व उपनगरातील (२४ तास सुरू) असलेल्या ३१ टँकर भरणा केंद्रांवर आयओटी आधारित अल्ट्रासॉनिक जलमापक बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पाणीटंचाईच्या काळात टँकर भरणा केंद्रावर एकाच वेळेत मोठ्या संख्येने टँकर भरण्यासाठी येतात. त्यामुळे येथे पाण्याचा उच्च दाब व उच्च प्रवाह निर्माण होतो. अशा परिस्थितीत निर्माण होणारा प्रवाह यांत्रिक पद्धतीच्या जलमापकांच्या मोजमाप करण्याच्या क्षमतेबाहेर जातो. परिणामी अशा परिस्थितीत यांत्रिक जलमापके योग्यरीत्या व अचूकपणे कार्य करू शकत नाहीत. अल्ट्रासॉनिक जलमापकांमध्ये यांत्रिक भाग नसल्यामुळे त्यांची प्रवाह वाहन तसेच प्रवाह मोजण्याची क्षमता ही यांत्रिक जलमापकांपेक्षा अधिक असल्याने मोजणीची अचूकता वाढते. अल्ट्रासॉनिक जलमापकांची प्रवाह मोजण्याची क्षमता ही यांत्रिक जलमापकांपेक्षा जास्त आहे.(IoT Water Meter)
मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग ...
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,टँकर भरणा केंद्रांवरून टँकरद्वारे होणा-या सक्षम जल वितरण व्यवस्थापन पाणीपुरवठ्याचे अचूक मोजमाप तसेच अॅक्वा सर्व्हरला माहिती प्राप्त झाल्यामुळे, सक्षम जल वितरण व्यवस्थापन शक्य आहे. भविष्यातील टँकर अॅप्लिकेशन एकाच ठिकाणी टँकरद्वारे होणा-या पाणीपुरवठ्याची माहिती उपलब्ध झाल्यामुळे, भविष्यात नागरिकांकरिता टँकर अॅप्लिकेशन तयार करणे शक्य होईल,असेही अधिकाऱ्यांनी नमुद केले आहे. यासाठी हॅपी सोल्युशन्स या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी सुमारे ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.(IoT Water Meter)
मुंबईतील एकूण टँकर भरणा केंद्र : ३१
सन २०१९ मध्ये ८० मिमी व १०० मिमी आकाराचे एकूण ६४ बसवली होती यांत्रिक जलमापके
टँकर भरणा केंद्रावर साधारण १० मिनिटांमध्ये १०,००० लिटर पाण्याचा प्रवाह
प्रति तासाला टँकर भरणा केंद्रावर ६०,००० लिटर पाण्याचा प्रवाह