रत्नागिरी : गणरायाला निरोप देण्याचा आनंद काही क्षणांतच दुःखात बदलल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील माभळे गावात घडली आहे. बावनदीत गणपती विसर्जनासाठी उतरलेले पिता-पुत्र पाण्याच्या प्रवाहात बुडाले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे वडिलांचे प्राण वाचवण्यात यश आले, मात्र या दुर्घटनेत तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.(Ganesh Visarjan Accident)
विसर्जनादरम्यान अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, घडशी कुटुंबीय आणि ग्रामस्थ संगमेश्वर पोलीस ठानासमोरील बावनदीच्या काठावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. विसर्जन विधी सुरू असतानाच अचानक पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पुरुषोत्तम गुणाजी घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल घडशी नदीच्या प्रवाहात बुडू लागले. हा प्रकार लक्षात येताच उपस्थित कुटुंबीयांचे व ग्रामस्थांचे हातपाय गळाले.(Ganesh Visarjan Accident)
नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या मोहिमेची भारतीय पुरुष हॉकी संघाने अत्यंत दणदणीत आणि ऐतिहासिक विजयाने सुरुवात केली आहे. 'पूल ए' अंतर्गत ...
आजोबांचा हात निसटला अन्...
पिता-पुत्र वाहून जात असल्याचे पाहून गुणाजी घडशी आणि दत्ताराम घडशी यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. बुडत असताना प्रज्वलने आपल्या आजोबांचा हात पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या अत्यंत जोरदार प्रवाहामुळे त्याचा हात सुटला आणि तो प्रवाहात लांब वाहून गेला. दरम्यान, श्रीकांत घडशी यांनी जीवाची कोणतीही पर्वा न करता नदीत उडी मारली आणि पुरुषोत्तम घडशी यांना सुरक्षित बाहेर काढले.(Ganesh Visarjan Accident)
तब्बल वीस मिनिटांनी शोध, पण तोपर्यंत उशीर झाला होता
वडिलांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर तरुणांनी आणि ग्रामस्थांनी बावनदीत तातडीने शोधमोहीम राबवली. तब्बल २० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर प्रज्वलला नदीबाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवल्याचे घोषित केले.(Ganesh Visarjan Accident)
रायगड : दुसऱ्यांचे वाद मिटवणे कधीकधी स्वतःच्याच जीवावर बेतू शकते, याची प्रचिती आणून देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना रायगड ...
एकिकडे लाडक्या बाप्पाला निरोप देताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे घडशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, माभळे गावावर शोककळा पसरली आहे.