सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पाच्या मुखदर्शनासाठी हजारो भाविक रांगेत उभे असताना अचानक वाहिनीमध्ये स्पार्क झाल्याने ठिणग्या उडाल्या. त्यामुळे रांगेत काहीशी धावपळ उडाली. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी आणि सुरक्षा रक्षकांनी ताबोडतोब धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसराची पाहणी केली जात आहे.(Lalbaugcha Raja Short Circuit)
नागोया (जपान) : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जपानमधील नागोया येथील मेईजो पार्क येथे 'संडेज ऑन सायकल'च्या ९१ व्या ...
काळाचौकी दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंता
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच काळाचौकी येथील महागणपतीच्या मंडपाजवळ अचानक विजेचा करंट लागून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ती दुर्घटना ताजी असतानाच आता थेट लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेत शॉर्टसर्किटची घटना घडल्याने गणेशोत्सवातील सार्वजनिक सुरक्षेचा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.(Lalbaugcha Raja Short Circuit)






