Tuesday, September 22, 2026

Jamui Crime : भररस्त्यात मुलीला अडवून नको तिथे स्पर्श; व्हायरल व्हिडिओतील 'ती' धक्कादायक दृष्यं पाहून संतापाची लाट!

Jamui Crime : भररस्त्यात मुलीला अडवून नको तिथे स्पर्श; व्हायरल व्हिडिओतील 'ती' धक्कादायक दृष्यं पाहून संतापाची लाट!

दहावीच्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तरुणांकडून त्रास; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 3 जणांना अटक

जमुई : बिहारमधील जमुई जिल्ह्यात अल्पवयीन मुलगा आणि मुलीला रस्त्यात अडवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली असून, इतर सहभागींचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं ? 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून जात असताना काही जणांनी त्यांना रस्त्यात थांबवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संबंधित मुला-मुलीशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काही जणांनी रेकॉर्ड केला आणि तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर जमुई पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. जमुईच्या पोलीस अधीक्षकांनीही व्हिडिओ आणि घटनेची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी पीडित मुलगा आणि मुलीशी संवाद साधून त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे. प्राथमिक तपासात या घटनेत सुमारे 6 ते 7 जण सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून व्हिडिओच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली जात असून, इतर संशयितांचा या घटनेत नेमका सहभाग किती होता, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण सुरू केले आहे. घटनेमागील नेमके कारण काय होते, तसेच या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरण असल्याने त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई सुरू आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >