मुंबई : मुंबईतील दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI ने दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात FIR दाखल करून तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ पन्ना सिंह याने काही महत्त्वाचे दावे केले आहेत. मात्र, हे दावे अद्याप तपासातून सिद्ध झालेले नाहीत.
आदित्य ठाकरे एकमेव मुलगा, मनात येईल ते करायचा
पन्ना सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, सुशांत 2019 मध्ये बिहारमधील पूर्णिया येथे आला होता. त्यावेळी तो आपल्याला काही महत्त्वाची माहिती सांगणार होता, मात्र वेळ कमी असल्यामुळे त्याला सविस्तर बोलता आले नाही. सुशांतने लवकरच मोठी माहिती देणार असल्याचे आणि पत्रकार परिषद घेण्याचा विचार असल्याचे सांगितल्याचा दावा पन्ना सिंह यांनी केला आहे.
पुणे : पुण्यातील लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण ...
दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी, 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत आपल्या वांद्रे येथील घरात मृतावस्थेत आढळला. दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचे दावे यापूर्वीही करण्यात आले आहेत. मात्र, या दोन्ही प्रकरणांमध्ये नेमका काय संबंध आहे, याचा तपास सध्या CBI करत आहे.
आदित्य हा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे त्याच्या मनात जे यायचे तेच तो करायचा. पन्ना सिंह यांचा असा दावा आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग होता. पन्ना सिंह म्हणाले की, "सीबीआयने आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कोणत्याही दबावाशिवाय आपल्या स्तरावर निष्पक्ष चौकशी करावी, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.मोठ्या कटातून सुशांतची हत्या, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांचे काका मनमोहन सिंह यांनी सांगितले की, आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. ज्यावेळी सुशांतच्या मृत्यूची बातमी आली होती, त्यावेळी तो आत्महत्या करू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. एका मोठ्या कटाचा भाग म्हणून सुशांतची हत्या करण्यात आली होती. यामध्ये अनेक बड्या लोकांचा समावेश होता आणि काही लोक तर असे आहेत ज्यांची नावे अजूनही समोर आलेली नाहीत.
सीबीआय करणार चौकशी
CBI ने दाखल केलेल्या FIR मध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), रिया चक्रवर्ती, दिनो मोरिया, सूरज पंचोली यांच्यासह अनेक व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याचा उल्लेख आहे. मात्र, CBI च्या माहितीनुसार या टप्प्यावर कोणालाही आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. तपासादरम्यान पुरावे मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना आपण कधी भेटलो किंवा ओळखत असल्याचा दावा फेटाळला आहे. या प्रकरणातील आरोप पुराव्याशिवाय करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले असून, निष्पक्ष तपास होऊ द्यावा, अशी भूमिका घेतली आहे.
CBI आता उपलब्ध कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळाशी संबंधित पुराव्यांचा तपास करत आहे. त्यामुळे या तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






