पंचांनी वाइड दिला आणि भारतीय खेळाडूंची नाराजी
जापानला विजयासाठी सहा चेंडूत 8 धावांची गरज होती. कर्णधार श्रेयस अय्यरने शेवटचं षटक अक्षर पटेलच्या हाती सोपवलं. या षटकात पहिले दोन चेंडू अक्षरने व्यवस्थित टाकले. पण तिसरा चेंडू टाकताना सलग दोन चेंडू वाइड टाकले. दुसऱ्यांदा वाइड दिल्यानंतर अक्षर पटेलसह भारतीय खेळाडूंचा राग अनावर झाला. अक्षर पटेलने आपली नाराजी स्पष्टपणे जाहीर केली. त्याने पंच ख्रिस थर्गेट यांच्याकडे आक्षेप नोंदवला. खेळाडूंची नाराजी पाहून कर्णधार श्रेयस अय्यरही तात्काळ तिथे आला आणि स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या ख्रिस ब्राउन यांच्यासोबत बोलला. श्रेयसने चर्चा केल्यानंतर ख्रिस ब्राउन यांनी दुसऱ्या पंचांशी चर्चा केली. मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम होते. पण अचानक निर्णय बदलला आणि वाइड दिलेला चेंडू योग्य असल्याचं सांगितलं.This is clearly a wide
Congratulations 👏 Shreyas Iyer on winning a game by 2 runs begging to umpires vs mighty Japan Aura so low that you have to fix games vs Japan to have win pic.twitter.com/MQhzGtOWId — 𝘿𝙖𝙠𝙨𝙝 (@screwgauge77) September 22, 2026
हुश्शsss! जापानविरुद्ध कसं बसं जिंकलो, नेमकं काय झालं सामन्यात? शेवटच्या षटकात असा थरार रंगला
भारत आणि जापान यांच्यात मैत्रिपूर्ण टी20 सामना नुकताच पार पडला. या सामन्यात जापानने भारतीय संघाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. खरं तर या सामन्यात ...





