पदवीधर-शिक्षक मतदारसंघांमध्ये हालचालींना वेग; पाचही जागांवर उमेदवारीवरून मित्रपक्षांमध्येच चुरस
मुंबई (सुहास शेलार) : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यातील राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून, पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, छत्रपती संभाजीनगर पदवीधर, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक या पाच मतदारसंघांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विरोधकांपेक्षा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येच अनेक ठिकाणी उमेदवारी आणि जागावाटपावरून चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमोरही योग्य उमेदवार निश्चित करण्याचे आव्हान आहे.(Mahayuti Seat Sharing)
सध्या या पाच जागांपैकी तीन जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रतिनिधित्व, तर दोन जागांवर महायुतीशी संलग्न सदस्य आहेत. २०२०च्या निवडणुकीच्या वेळी राजकीय समीकरणे पूर्णपणे वेगळी होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. परिणामी, त्या वेळी एकत्र असलेल्या पक्षांचे आज वेगवेगळे राजकीय गट झाले आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीतील पक्षीय समीकरणे आणि २०२६मधील स्थिती यांची सरळ तुलना करणे सोपे राहिलेले नाही. या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पदवीधर आणि शिक्षक मतदारांची नव्याने तयार होणारी यादी. पुणे विभागात पात्रता तारीख १ नोव्हेंबर २०२५ धरून मतदारयादीची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांनी मतदार नोंदणीवर दिलेला भर हा निवडणूकपूर्व तयारीतील महत्त्वाचा भाग ठरत आहे.(Graduate Constituency Election)
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीज (Moody's) नंतर आता फिच रेटिंग्स (Fitch Ratings) ने ...
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप की राष्ट्रवादी?
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात २०२०मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड विजयी झाले होते. आता लाड यांनी निवडणूक न लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी दावा केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात आला असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याविषयी भूमिका मांडली आहे. भाजपने राजेश पांडे यांच्यावर मतदार नोंदणीची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
पुणे शिक्षकमध्ये शिंदे-सामंतांचे ओएसडी इच्छुक
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर पुन्हा इच्छुक आहेत. महायुतीकडून मात्र शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे आणि सचिन सानप यांची नावे चर्चेत आहेत. चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी, तर सानप हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडी आहेत. त्याशिवाय येथे भाजपकडूनही चाचपणी सुरू आहे. त्यामुळे जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि त्यानंतर उमेदवार कोण, हा पेच कायम आहे. शिक्षकांचे वेतन, पेन्शन, भरती आणि सेवाशर्ती हे मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात.(Graduate Constituency Election)
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचा दावा, भाजपची तयारी
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने २००८पासून सलग तीन विजय मिळवले आहेत. विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे अजित पवार गटासोबत असून पुन्हा इच्छुक आहेत. मात्र भाजपनेही वर्षभरापासून मतदार नोंदणीवर भर दिला आहे. माजी आमदार संजय केणेकर आणि प्रवीण घुगे यांची नावे इच्छुकांमध्ये चर्चेत आहेत. त्यामुळे जागा राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि जागा मिळवण्यासाठी भाजपमध्ये स्पर्धा आहे.(Mahayuti Seat Sharing)
Nashik Accident News : दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ...
नागपूरसाठी भाजपची मोर्चेबांधणी
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा मतदारसंघ भाजपच्या पारंपरिक प्रभावाचा मानला जातो. मात्र २०२०मध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचा पराभव केला. काँग्रेसने त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. भाजपकडून धर्मपाल मेश्राम, संदीप जोशी आणि प्रवीण कोहळे यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार निवडीकडे लक्ष लागले आहे.(Graduate Constituency Election)
अमरावतीत सरनाईकांपुढे पक्षांतर्गत आव्हान
२०२०मध्ये अपक्ष म्हणून विजयी झालेले किरण सरनाईक यांनी आता शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यांच्यासह माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांचेही नाव इच्छुक म्हणून चर्चेत आहे. काँग्रेसकडून प्रा. आदिती पोहरे यांच्या नावाची तयारी सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघातही पक्षीय समीकरणांसोबत उमेदवारीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पाचही मतदारसंघांच्या निवडणुकीत मागील निकालापेक्षा बदललेली पक्षीय समीकरणे अधिक महत्त्वाची ठरणार आहेत. महायुतीतील जागावाटप, महाविकास आघाडीची उमेदवार निवड आणि पदवीधर-शिक्षक मतदारांची नव्याने होणारी नोंदणी यामुळे अंतिम लढतीचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच स्पष्ट होईल.(Mahayuti Seat Sharing)