Nashik Accident News : दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यासमोर पिंपळगाव परिसरात दोन ट्रकचा अपघात झाला. एका ट्रकचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर ट्रकमध्ये काही जण अडकल्याचे निदर्शनास येताच गिरीश महाजन यांनी आपला ताफा थांबवला आणि घटनास्थळी धाव घेतली. चालक, क्लिनरसह काही जण ट्रकमध्ये अडकल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी बचावकार्यात मदत केली.
ट्रकवर चढून जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत
अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी महाजन यांनी स्वतः मदत केली. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित नागरिकांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. जखमींना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी त्यांना शासकीय वाहनातून रुग्णालयात रवाना करण्यात आले. तसेच घटनास्थळी उपस्थित प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार गोकुळ गीते, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान सदर अपघातामध्ये राजस्थानातील ड्रायव्हर भुरा गुर्जर यांच्या उजव्या पायाच्या टिबिया (जांघेखालील पायाच्या हाडाला) फ्रॅक्चर. झाले आहे तर दुसऱ्या त्यांचे सहकारी नंदकिशोर गुर्जर यांच्या शरीराला किरकोळ स्वरूपाची दुखापत (Blunt Trauma) झाली असून घोट्याला सूज आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
Nashik : इगतपुरी तालुक्यातील तीन ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईला अखेर स्थगिती देण्यात आलीय. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर ...
दुष्काळ पाहणीचा दौरा थांबवून माणुसकीला प्राधान्य
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री महाजन यांचा दौरा सुरू असताना हा अपघात झाला. शेतकरी आणि ग्रामीण भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी निघालेला हा दौरा काही काळ थांबवत त्यांनी प्रथम अपघातग्रस्तांच्या मदतीला प्राधान्य दिले. अपघातस्थळी केवळ सूचना देऊन न थांबता प्रत्यक्ष बचावकार्यात सहभागी होत जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. मंत्री महाजन स्वतः ट्रकच्या केबिनमध्ये चढून अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
यापूर्वीही अपघातग्रस्तांच्या मदतीला धाव
संकटाच्या प्रसंगी ताफा थांबवून मदत करण्याची महाजन यांची ही पहिलीच घटना नाही. १३ सप्टेंबर रोजी मुलुंड ब्रिजजवळ ट्रक उलटून झालेल्या अपघातावेळीही त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींची विचारपूस केली होती आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यापूर्वी नाशिक दौऱ्यात रस्त्यावर अचानक प्रकृती बिघडलेल्या महिलेला मदत करण्यासाठी ताफा थांबविल्याची घटनाही समोर आली होती. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, प्रशासकीय दौरे किंवा राजकीय कार्यक्रमांपेक्षा संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी, याला ते प्राधान्य देत असल्याचे त्यांच्या अशा घटनांमधून दिसून येते.
Nashik Dr Manisha Jejurkar Death Case : गंगापूर रोडवरील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये ६ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा जेजुरकर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांच्या बहीण ...
“पहिले जीव वाचवणे, बाकी सर्व नंतर…”
पिंपळगावजवळील या घटनेत दुष्काळ पाहणीचा दौरा सुरू असतानाही महाजन यांनी आपला ताफा थांबवून थेट अपघातस्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी स्वतः मदत केली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी पाठवले. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. पद, प्रोटोकॉल आणि ताफा यापेक्षा एखाद्या संकटात सापडलेल्या माणसाचा जीव महत्त्वाचा असतो पिंपळगावजवळील अपघाताच्या प्रसंगी महाजन यांच्या कृतीतून हा मानवी दृष्टिकोन पुन्हा एकदा दिसून आला.