Cyber Crime : ‘Rent A Garba Partner’ की हनी ट्रॅप? गरब्याच्या व्हायरल जाहिरातींवर मुंबई ते अहमदाबाद सायबर क्राईमची नजर

मुंबई : नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गुजरात, मुंबईसह देशभरात गरबा आयोजनाची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘Rent A Garba Partner’ म्हणजेच ‘भाड्याने गरबा पार्टनर’ अशा आशयाच्या जाहिराती व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये या जाहिरातींची चर्चा असून, सायबर क्राईम यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू आहे. (Cyber Crime)


व्हायरल पोस्टमध्ये Silver, Gold आणि Platinum अशा पॅकेजेसचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये काही तास गरबा खेळणे, मॅचिंग पोषाख, गरब्याच्या स्टेप्स शिकवणे, सेल्फी आणि सोशल मीडिया Reels बनवणे यांसारख्या सेवांचा दावा करण्यात आला आहे. काही पॅकेजमध्ये कार्यक्रमात पूर्णवेळ सहभाग, फूड आउटिंग आणि घरी सुरक्षित पोहोचवण्याचाही उल्लेख आहे. (Cyber Crime)



बनावट जाहिराती; हनीट्रॅपची शक्यता


अहमदाबाद सायबर सेल आणि पोलिसांनी या जाहिराती बनावट असल्याचे स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये किंवा पैसे देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली आहे. या जाहिरातींच्या माध्यमातून फसवणूक, हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग किंवा आर्थिक लूट होण्याची शक्यता असल्याचा इशारा देत संबंधित सोशल मीडिया प्रोफाईल्सची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Cyber Crime)



चीनमधून आली संकल्पना?


‘भाड्याने पार्टनर’ घेण्याची संकल्पना चीनमधील काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आढळते. तिथे विशेषतः Lunar New Yearच्या काळात कुटुंबीयांचा लग्नाचा दबाव टाळण्यासाठी तरुण-तरुणी भाड्याने पार्टनर घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र, भारतात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा जाहिराती समोर आल्याने त्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


सध्या मुंबई, अहमदाबाद आणि सुरत येथील सायबर क्राईम यंत्रणा या जाहिरातींमागील सूत्रधारांचा शोध घेत असून, नागरिकांनी सोशल मीडियावरील अशा संशयास्पद जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Cyber Crime)


Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी; 25 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक तयारी

Dhaktya Sunbai Serial: मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेचा शुभारंभ, कधी अन् कुठं पहायला मिळणार?

मुंबई: गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू होणारी प्रत्येक नवी सुरुवात खास असते. याच भावनेतून झी मराठीने आपल्या

Asian Games 2026 : सीमा कुमारीची ऐतिहासिक कामगिरी! महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत पटकावले कांस्यपदक

नागोया (जपान) :जपानमधील नागोया येथ

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागांत 24 तास पाणीपुरवठा विस्कळीत, 7 दिवस कमी दाबाने पाणी

मुंबई : एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी तुर्भे निम्नस्तरीय जलाशय ते तुर्भे

Starbucks : स्टारबक्सचा मोठा निर्णय; उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स बंद होणार

मुंबई : स्टारबक्स आपल्या स्टोअर नेटवर्कचा आढावा घेत असून, या प्रक्रियेअंतर्गत उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स

Federal Bank FASTag : जुन्या फास्टॅगला रामराम न करता बँक बदलणे झाले सोपे! फेडरल बँकेकडून क्रांतिकारी 'वनटॅग' सुविधा सुरू

मुंबई : भारतातील डिजिटल वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल उचलत Federal Bank ने 'OneTag – FASTag Portability' ही नवीन