Nashik : वडिलांना पोहतांना पाहिल्यानंतर मुलगा ही पाण्यात उतरला अन् अनर्थ घडला ! बुडणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचाही मृत्यु , १४ वर्षीय मुलगा बेपत्ता

Nashik : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये खळबळजनक घटना घडली, गुरुवारी पाण्यात पोहत असलेल्या वडिलांना पाहून पाण्यात उतरलेल्या १४ वर्षीय मुलाचा डोहातील पाण्याच्या प्रवाहात बुडण्याचा प्रकार लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाला. मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून, त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही.या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त आहे.


गुरुवारी (दि.२४) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पहिने बारी ते वाडीवऱ्हे रस्त्यालगत असलेल्या डोहात ही दुर्दैवी घटना घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजय धोंडू सोनवणे (वय ४८, रा.अक्षय चौक, नवीन नाशिक ) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री सोनवणे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.



नेमकं काय घडलं ?


संजय सोनवणे हे डोहातील पाण्यात पोहत होते. त्यांना पाहून त्यांच्या मुलालाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळातच तो पाण्यात बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे दुरवरुन लक्षात येताच संजय सोनवणे यांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, डोहातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.



मुलगा अद्यापही बेपत्ता


पोलिसांसह बचाव पथकाने शोधमोहीम राबवत रात्री साडेसातच्या सुमारास संजय सोनवणे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिस आणि बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

एकदाच पैसे भरा अन् आयुष्यभर खिशात खुळखुळणार पैसा! LIC ची ही भन्नाट योजना ठरतेय गेम चेंजर

LIC Pension : आयुष्यभरात केलेल्या कष्टाच्या कमाईनंतर म्हातारपणी आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागू नये,

Airtel Buy 1 Get 1 Recharge Offer: एअरटेलची धमाकेदार ऑफर! ₹349 आणि ₹399 च्या रिचार्जवर मिळणार 1 रिचार्ज फ्री; 56 दिवसांची वैधता

एअरटेल ब्रॉडबँड नेटवर्कने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी निवडक प्रीपेड वापरकर्त्यांना Buy 1 Get 1 Free

वेलची खाण्याचे 3 जबरदस्त फायदे! पचनापासून तोंडाच्या फोडांपर्यंत ठरते गुणकारी

स्वयंपाकघरात वापरली जाणारी वेलची (इलायची) केवळ अन्नाची चव आणि सुवास वाढवण्याचे काम करत नाही, तर आरोग्यासाठीही ती

Old Phone Reuse: जुना स्मार्टफोन तुमच्या गाडीसाठी डॅशकॅम म्हणून वापरता येतो; कसे ते जाणून घ्या

Old Phone Reuse: रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी आणि रोड रेजच्या घटना बघता, आपल्या चारचाकी गाडीत डॅशकॅम बसवणे गरजेचे आहे.

मुंबईतील १० अग्निशमन केंद्र बनणार ऊर्जेत स्वावलंबी, भायखळा मुद्रणालयासाह १० अग्निशमन केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने आता वीज बचतीचा मार्ग अवलंबवण्यास सुरुवात केली असून देशाचे

मुंबई फटाक्यांनी पेटतेय! एकाच दिवसांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या १३७ घटना

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजीवर न्यायालयाने निर्बंध घातलेले असताना त्यानुसार महापालिका