Saturday, September 26, 2026

Crime News : कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन्... पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ

Crime News : कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन्... पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ

Crime News : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवा पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. विजय कोळी असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेनं पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. निगडीतील ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. कौटुंबिक वादानंतर ते बुधवारी (दि. २३) घरातून निघून गेले होते.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिस दलात (Pune Crime News) कार्यरत असणारे विजय कोळी कौटुंबिक कलहातून दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. त्यांच्या पत्नी सारिका विजय कोळी यांनी याबाबत चिखली पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कोळी हे आरटीपीसी म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोळी घरातून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. जाताना त्यांच्याकडे सरकारी पिस्तूल असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणेने त्यांचा शोध सुरू केला होता.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ

कोळी निगडी दुर्गा देवी टेकडी परिसरात शेवटचे दिसल्याने त्यांचा ड्रोनच्या साहाय्याने देखील शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आज शनिवारी अखेर सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपोमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.घटनास्थळी सरकारी पिस्तूलही मिळून आले. प्राथमिक तपासात त्यांनी त्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >