Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट 2026 महिन्याचा ₹1,500 चा हप्ता रखडल्यामुळे लाभार्थी महिलांकडून पैसे कधी जमा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट 2026 महिन्याचा ₹1,500 चा हप्ता रखडल्यामुळे लाभार्थी महिलांकडून पैसे कधी जमा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana August Installment)


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार-संलग्न बँक खात्यात दरमहा ₹1,500 थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जमा केले जातात.


ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेत जमा न झाल्याने गणेशोत्सवाच्या काळात लाभार्थी महिलांचे लक्ष या रकमेच्या प्रतीक्षेकडे लागले होते. आता शासनाकडून हप्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पुढे सरकली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींना लवकरच त्यांच्या खात्यात ₹1,500 जमा झाल्याचा संदेश मिळू शकतो. (Ladki Bahin Yojana August Installment)




पैसे खात्यात आले की नाही, हे कसे तपासता येईल ?


हप्ता जमा झाल्याचा मोबाईलवर मेसेज आला नाही, तरी काही सोप्या पद्धतींनी खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासता येईल.




  • बँकेच्या कस्टमर केअरवर संपर्क करून खात्यातील शिल्लक तपासा.

  • मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगमधून बँक स्टेटमेंट तपासा.

  • बँकेच्या अॅपमध्ये खात्यातील व्यवहार पाहा.

  • जवळच्या बँक शाखेत जाऊन खात्यात ₹1,500 जमा झाले आहेत का, याची खात्री करा.


दरम्यान, योजनेशी संबंधित कोणतीही लिंक किंवा अनोळखी संदेशावर क्लिक करण्याऐवजी अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरूनच माहिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Ladki Bahin Yojana August Installment)


 

Comments
Add Comment

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्र सरकारची टीम घेणार दुष्काळी भागाचा आढावा

दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन

महाराष्ट्रातील बंदर विकासाला मिळणार नवी दिशा; मंत्री नितेश राणे यांच्याकडून कृष्णापटणम अदानी पोर्टची पाहणी

राज्यातील बंदर क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि सागरी व्यापाराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी

‘एमपीएससी’चे आंदोलन आता राजकीय झाले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विद्यार्थ्यांच्या पाचही मागण्या आधीच मान्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता

Mahila Shetkari Praman Patra : महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ३७ लाखांहून अधिक अर्ज राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

८९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा, ६८ हजार ४३६ महिलांना प्रमाणपत्र मुंबई : शेतीतील महिलांच्या योगदानाला ओळख

अंमली पदार्थांची साखळी तोडण्यासाठी पोलीस, एफडीए, एमआयडीसी एकत्र - २०२९ पर्यंत ‘अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्रा’चे लक्ष्य

मुंबई : औद्योगिक वसाहतींच्या आडून होणाऱ्या सिंथेटिक आणि सेमी-सिंथेटिक अंमली पदार्थांच्या निर्मितीला, विक्रीला

दुष्काळातही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही - परभणीतील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मुंबई : दुष्काळातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी