काय म्हणाला दीपक चहर?
आपल्या बॅट्स चोरीला गेल्यानंतर दीपक चहरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. यात दीपक चहर म्हणाला की, 'काल संध्याकाळी मैदानावरून तीन प्लेयर एडिशन बॅट्स चोरीला गल्या. आता सांगा मी नेमकं काय करू? ज्याने या बॅट चोरल्या त्याला या बॅट्सच्या किंमत माहिती नसेल. त्या तीन बॅट्सची किंमत दीड लाख रुपये होती. आता तो जाऊन त्या किंवा टेनिस बॉलने खेळेल. अरे, भावा माझ्याकडूनच पैसे घ्यायचे होते, मी दिले असते.'दीपक चहरने पुढे सांगितलं की, 'माझ्याकडे काही पर्याय आहेत. यात पहिलं तर पोलिसात तक्रार करू कि योगींकडे जाऊ की मोदींकडे.. किंवा थेट देवाकडे तक्रार करू. ज्याने ही चोरी केली त्याला बुद्धी मिळो आणि मला बॅट परत करो.. मी त्याला पैसे देईन. नाही तर एसएसला रिक्वेस्ट करून आणि बॅट मागून घेऊ. तुम्हाला काय वाटते? मी काय करायला हवं.'Deepak Chahar says three of his Player Edition bats, worth around ₹1.5 lakh in total, were stolen from the ground. 😂 He says he now has a few options: go to the police, ask Yogi Ji or Modi Ji for help, pray to God… or simply ask SS for new bats. 😂 Deepak Chahar to the… pic.twitter.com/vaN238MyY2
— Mention Cricket (@MentionCricket) September 28, 2026
IND vs WI सामन्यासाठी इशान किशन आणि अभिषेक शर्माचा देशी जुगाड! जापानमध्ये असा पाहिला सामना Video
जापानच्या आयची नगोया येथे एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना ...





