Nitesh Rane : बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावाला मंत्री नितेश राणे यांची भेट

गाळ काढण्यासह संवर्धन तलावाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश


जालना : कमी पावसामुळे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane)यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तलाव परिसराचा आढावा घेतला तसेच स्थानिक मच्छीमार बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी समजून घेतल्या. या पाहणी दौऱ्यावेळी मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, सहआयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव यांच्यासह जलसंपदा आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



मच्छीमार बांधवांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन


चालू वर्षात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने राजेवाडी तलावातील पाणीपातळी तळाला गेली आहे. याचा थेट फटका स्थानिक मत्स्यव्यवसायाला बसला असून मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मच्छीमारांनी आपल्या विविध मागण्या आणि अडचणी मंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, राज्य शासनाच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल आणि अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असा विश्वास मंत्र्यांनी दिला.



तलावातील गाळ काढणे आणि 'संवर्धन तलावा'चा प्रस्ताव


राजेवाडी तलावाची पाणीसाठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी सिंचन व पाटबंधारे विभागाने तातडीने तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, असे स्पष्ट निर्देश नितेश राणे यांनी दिले. तसेच, तलावात वारंवार होणाऱ्या पाणीकपातीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून भविष्यातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी 'संवर्धन तलाव' उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव विनाविलंब शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.



कंत्राटदारांच्या मनमानीवर कारवाईचे आदेश


तलाव परिसरात मुरूम उत्खनन करताना काही कंत्राटदारांकडून काढलेला टाकाऊ गाळ आणि माती थेट तलावातच टाकली (डम्पिंग) जात असल्याचे या पाहणी दरम्यान उघडकीस आले. या प्रकारामुळे तलावाचे आकारमान आणि पाणीसाठवण क्षमता कमालीची घटली आहे. या गंभीर बाबीची दखल घेत पाटबंधारे विभागाने तात्काळ या जागेची पाहणी करावी आणि दोषी कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.



'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा लाभ घेण्याचे आवाहन


राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय आधुनिक करण्यासाठी राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक मच्छीमार बांधवांनी 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी शेवटी केले.

Comments
Add Comment

Single Mother Education Policy : एकल माता कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरणाचा मार्ग मोकळा

- ‘शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६’साठी समितीचा अहवाल सादर मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील

Nitesh Rane : अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादनात मोठी घट; मंत्री नितेश राणे यांनी दिले पंचनाम्याचे आदेश

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश

MSRTC : ‘लालपरी’ आता होणार ‘ई-लालपरी’; 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक बसेसचे लक्ष्य

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता मोठा बदल होणार आहे. सन 2037 पर्यंत

Beed Bottle Mic Reporting : ‘आम्हाला अधिकारी व्हायचंय, फक्त शिक्षक द्या...’; बॉटल माईक घेऊन चिमुकल्यांनी मांडली समस्या, प्रशासनानेही घेतली दखल

बीड : “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या...” अशी भावनिक हाक देत बीडच्या हिवरापहाडी येथील

Pune Crime Vaishnavi Jarande : ४० लाखांचं लग्न अन् १० तोळे सोनं देऊनही ५ लाखांसाठी छळ; पुण्यात ३ महिन्यांच्या गरोदर तरुणीचा मृत्यू

पुणे : पुण्यातील उंड्री (वडाचीवाडी) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. २६ वर्षीय

Nitesh Rane : शिवणाटाकळी तलावातील पाणीपातळीत घट; पंचनाम्यानंतर पात्र मच्छीमारांना मदत मिळवून देणार - मंत्री नितेश राणे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे