Monday, September 28, 2026

Box Office Collection: सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’ आणि नानीच्या ‘द पॅराडाईज’ चित्रपटाची कोट्यवधींची कमाई!

Box Office Collection: सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’ आणि नानीच्या ‘द पॅराडाईज’ चित्रपटाची कोट्यवधींची कमाई!

मुंबई: चित्रपटांच्या विश्वात सध्या बॉक्स ऑफिसवर सुगीचे दिन सुरू असून, प्रेक्षकांचा चित्रपत्रांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या ‘द वन’ (The One) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कमाईत जबरदस्त वाढ नोंदवली आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेता नानीच्या ‘द पॅराडाईज’ (The Paradise) या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे.

सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’चा बॉक्स ऑफिसवरील जलवा सॅकनिल्कच्या (Sacnilk) आकडेवारीनुसार, ‘द वन’ या चित्रपटाने रविवारी दमदार भरारी घेत 14 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी, तर दुसऱ्या दिवशी 11.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. यासह अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई 33.25 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातही या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. जगभरात ‘द वन’ने 43.15 कोटी रुपयांचा ग्रॉस व्यवसाय केला असून, हा चित्रपट आता 50 कोटी रुपयांच्या टप्प्याच्या अत्यंत जवळ पोहोचला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आणि तमन्ना यांच्याशिवाय सुनील ग्रोवर, मनीष पॉल आणि श्वेता तिवारी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, ज्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.

नानीच्या ‘द पॅराडाईज’ची १०० कोटींकडे यशस्वी वाटचाल दुसरीकडे, अभिनेता नानीचा बहुचर्चित चित्रपट ‘द पॅराडाईज’ बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटाने रविवारी चौथ्या दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून तब्बल 15.70 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

सुरुवातीच्या तीन दिवसांतील 64.80 कोटी रुपयांच्या कमाईसह या चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई आता 80.50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे हा चित्रपट आता 100 कोटी रुपयांच्या आकड्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. तसेच, जगभरात ‘द पॅराडाईज’ने आतापर्यंत 138.25 कोटी रुपयांचा घसघशीत ग्रॉस कलेक्शन केला आहे. या चित्रपटात नानीसोबत राघव जुयाल, ज्येष्ठ अभिनेते मोहन बाबू आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

एकूणच, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मने जिंकण्यात पूर्णपणे यशस्वी ठरले असून येत्या दिवसांत त्यांची कमाई आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >