कागिसो रबाडाचं नाव असलं तरी 9 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळेल की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. जर खेळणार असेल तर पहिल्या सामन्यात खेळेल का? की दुसऱ्या सामन्यापासून संघात येईल? हा देखील प्रश्न आहे. माहितीनुसार, या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण अफ्रिकेने इंट्रा स्क्वॉड सराव सामना खेळणार आहे. यात रबाडाच्या फिटनेसची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर त्याच्यावर निर्णय घेतला जाईल.
वुमन्स प्रीमियर लीग 2027 हे स्पर्धेचं पाचवं पर्व आहे. या स्पर्धेसाठी पाचही फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचं वर्चस्व ...
कसोटी मालिकेत रबाडाच नाही, तर आणकी एका वेगवान गोलंदाजाने लक्ष वेधून घेतलं आहे. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया याची संघात निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नॉर्खिया फिटनेसच्या कारणामुळे संघाच्या बाहेर होता. त्यामुळे मागच्या साडे तीन वर्षांपासून कसोटी सामना खेळलाच नाही. मार्च 2023 मनंतर पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. नॉर्खियाने 19 कसोटी सामन्यात 70 विकेट घेतले असून जर फिट झाला तर ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकते.
कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), मार्कस एकरमॅन, डेविड बेडिंगहम, कॉर्बिन बॉश, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी जॉर्जी, सायमन हारमर, मार्को यानसन, केशव महाराज, एडन मार्करम, वियान मुल्डर, सेनुरान मुथुसामी, एनरिक नॉर्खिया, डेन पॅटरसन, कगिसो रबाडा, रायन रिकलटन, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेना.