Maharashtra Government : कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी ३ हजार कोटी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र कर्जखात्यांना लाभाची रक्कम वितरित करण्यासाठी राज्य सरकारने आणखी ३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. या निधीतून पात्र शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यांमध्ये लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र कर्जखात्यांना लाभाची रक्कम वितरित करण्यासाठी राज्य सरकारने आणखी ३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. या निधीतून पात्र शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यांमध्ये लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. (Maharashtra Government)






मंत्रिमंडळाच्या २ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ला मंजुरी देण्यात आली होती. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे या योजनेसाठी २० हजार ५५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी यापूर्वी विविध शासन निर्णयांद्वारे ११ हजार १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार, उपलब्ध असलेल्या उर्वरित निधीपैकी ३ हजार कोटी रुपये वितरित करण्यास सहकार विभागाने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला आहे.(Maharashtra Government)

Comments
Add Comment

शेतकऱ्यांनो, ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा! सरकारी मदत मिळवण्यासाठी महत्त्वाचे आवाहन

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांसह अन्य शासकीय योजनांचा लाभ थेट

राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील दारात आता आरोग्यसेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी

Eknath Shinde : 11 वर्षांपासून बंद असलेला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कारखाना पुन्हा सुरू होणार; केंद्राकडून 1,500 कोटींची मदत

पुणे : तब्बल 11 वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या कारखान्याला पुन्हा

Samruddhi Mahamarg : 120 वेगमर्यादेच्या समृद्धी महामार्गावर गुरांचा कळप! वाहनचालकांचा थरकाप, मोठा अनर्थ टळला

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ नुकताच २ दिवसापूर्वी भीषण

केंद्र सरकारकडून आदिवासी बांधवांवर योजनांचा पाऊस, 'या' गोष्टींमुळे समाजाचे पालटणार जीवन

मुंबई: भारतात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या जतनासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक

आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; गडचिरोलीला विकासाच्या नकाशावर पहिल्या क्रमांकावर आणणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

गडचिरोली: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस