मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियाल बाबा झाला आहे. वयाच्या 37 व्या वर्षी गायक बाबा झाला आहे. जुबिनची पत्नी रिचा चंडेल हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. जुबिन आणि रिचाच्या घरी गणेश चतुर्थीच्या दिवशी गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जुबिनने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. 14 सप्टेंबरला रिचाने मुलाला जन्म दिला आहे. जुबिन बाबा झाल्याची बातमी कळताच चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. मुलाखतीत जुबिनने बाळ आणि आई दोघेही व्यवस्थित असल्याची माहिती दिली असून ते आता रूग्णालयातून घरी परतले आहेत.
मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgan) बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘Drishyam: The Conclusion’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये ...
जुबिनने काही तासांपूर्वीच बॉम्बे टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत जुबिनने सांगितले की, "मी गणेश चतुर्थीच्या दिवशी (14 सप्टेंबर, सोमवार) वडील झालो. रिचाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित असून ते सुखरूप घरी परतले आहेत. बाळाच्या जन्मानंतर सध्या घरी आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येक व्यक्ती बाळाला पाहून आनंदित होत आहे. नौटियाल कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे." जुबिनला सध्या चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सिंगरकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. सध्या तरी नौटियाल कुटुंबीयांकडून मुलाच्या नावाबद्दल ठरवलं नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री आणि मॉडेल तान्या मिश्रा (Tanya) हिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तान्याचे ग्लॅमरस फोटो आणि स्टायलिश लूक पाहून अनेक ...
मीडिया रिपोर्टनुसार, जुबिनने त्याच्या बालपणाच्या मैत्रिणीसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. एप्रिल 2026 मध्ये, जुबिनने लग्न केल्याचं उघड झालं. त्याने गुपचूप लग्नगाठ बांधली होती. जुबिन नौटियाल बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सिंगरपैकी एक आहे. त्याने आपल्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 'राता लंबिया', 'तुझे कितना चाहने लगे हम', 'काबिल हूं', 'लो सफर', 'कुछ तो बता जिंदगी'सह असे अनेक गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. डिसेंबर 2026 मध्ये जुबिन युके टूरसाठी जाणार आहे. भारतातच नाही तर, आता परदेशातही जुबिन आपल्या आवाजाने चाहत्यांच्या मनावर नक्कीच राज्य करेल, यामध्ये शंका नाही.




