Tuesday, September 29, 2026

आजवरचे सर्व विक्रम मोडले..! भारतीय गोलंदाजाची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, असा रचला इतिहास

आजवरचे सर्व विक्रम मोडले..! भारतीय गोलंदाजाची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, असा रचला इतिहास
भारतीय महिला संघाची स्टार फिरकीपटू श्री चरणी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.त्याचं फळंही तिला मिळताना दिसत आहे. आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत श्री चरणीने ऐतिहासिक नोंद केली आहे. आयसीसीने जारी केलेल्या क्रमवारीत तिने पहिलं स्थान पटकावलं आहे. पण यासह तिने आजवरचे सर्व विक्रमही मोडीत काढले आहेत. टी20 क्रमवारीत सर्वाधिक प्वाइंट्स मिळवणारी गोलंदाज ठरली आहे. श्री चरणीने 817 रेटिंग प्वॉइंटसह पहिलं स्थान पटकावलं आहे. आतापर्यंत टी20 क्रमवारीत मिळवलेले सर्वाधिक गुण आहेत. आतापर्यंत हा पल्ला कोणत्याही खेळाडूला गाठता आलेला नाही. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी मेगन शूट हीचा विक्रमही मोडीत काढला आहे. मेगनने 2018 या वर्षी 806 गुण मिळवले होते. आतापर्यंत हा महिला क्रिकेटमधील मोठा विक्रम होता. मात्र हा विक्रम श्री चरणीच्या नावावर झाला आहे. श्री चरणीने आपल्या चमकदार कामगिरीने हा पल्ला गाठला आहे.

श्री चरणीची चमकदार कामगिरी

भारतीय महिला संघाने आशिया कप स्पर्धेनंतर एशियन गेम्स स्पर्धेतही जेतेपद मिळवलं आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये श्री चरणी आपल्या फिरकीची छाप सोडली. आशिया कप स्पर्धेत श्री चरणीने एकूण 12 विकेट काढल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात श्री चरणीने 20 धावा देत 4 विकेट घेतल्या. एशियन गेम्स स्पर्धेत जापानविरुद्धच्या सामन्यात 10 धावा देत 4 विकेट काढल्या होत्या. ही तिची या फॉर्मेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या गोल्डन पदकाच्या सामन्यातही तिने 2 विकेट काढल्या होत्या. तिच्या या कामगिरीचा फायदा तिला गुणांकनात झाला आणि 817 रेटिंग प्वाइंट मिळाले.

दीप्ति शर्माचं योगदान

भारताची अष्टपैलू खेळाडू आणि फिरकी गोलंदाज दीप्ति शर्मा हीनेही आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आहे. दीप्ती शर्माच्या नावावर 754 गुण आहेत. यासह ती आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. दीप्ति शर्माने एशियन गेम्स स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात तीन विकेट काढल्या होत्या. त्याचा फायदा तिला गुणांकनात झाला. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची सोफी एक्लेसटन असून तिचे 732 रेटिंग प्वॉइंट आहेत. तर इंग्लंडच्या चार्ली डीनचे 722 आणि इयान बेलचने 712 रेटिंग प्वॉइंट आहे. चार्ली चौथ्या, तर इयान पाचव्या क्रमांकावर आहे.

                            
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >