Tuesday, September 29, 2026

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या वेळापत्रकाची या तारखेला होणार घोषणा, जाणून घ्या

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या वेळापत्रकाची या तारखेला होणार घोषणा, जाणून घ्या
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे आहे. दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश यजमान आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होईल, अशी माहिती पुढे आली होती. पण नेमकी कधी ते कोणालाच माहिती नाही. अशा स्थितीत या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांनी त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतीय संघही कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात तयारी करत आहे. असं असताना या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसी 1 ऑक्टोबर 2026 रोजी या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करणार आहे. यासह तिकिटांसह बॅलेटही सुरू होणार आहे. पण तिकीट खरेदीसाठी उपलब्ध नसतील, पण फॅन्स रजिस्टर मात्र करू शकतील.

कधीपासून स्पर्धेला होणार सुरूवात?

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार,
" target="_blank" rel="noopener">वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला 2 ऑक्टोबर 2027 पासून सुरूवात होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य आणि दक्षिण अफ्रिकेतील त्यांचं योगदान लक्षात ठेवून ही तारीख निवडली जाणार असल्याचं बोललं जात आहे. ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या या स्पर्धेची सांगता नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेच्या जेतेपदाची लढत 21 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. वर्ल्डकप मध्ये सहभागी होणाऱ्या 14 पैकी 10 संघ हे 30 सप्टेंबरला निश्चित होतील. यात दोन यजमान देश असतील. यात दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे हे देश असतील. बाकीचे आठ देश आयसीसी वनडे रँकिंगनुसार ठरतील. तर उर्वरित चार संघ पात्रता फेरीतून समोर येतील आणि त्यापैकी दोन संघ अंतिम स्पर्धेत खेळतील. विशेष म्हणजे यजमान असलेल्या नामिबिया या स्पर्धेत पात्र होणं कठीण आहे.

वनडे वर्ल्डकपसाठी हे संघ होणार पात्र!

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी सध्याची रँकिंग पाहाता अफगाणिस्तानही पात्र ठरेल. नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशलाही संधी मिळेला. भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान हे संघ आयसीसी क्रमवारीनुसार पात्र ठरतील. तर नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशला दक्षिण अफ्रिकेमुळे लाभ मिळणार आहे. कारण यजमान देश असल्याने या क्रमवारीत धरला जाणार नाही. त्यामुळे नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशला थेट तिकीट मिळेल. तर वेस्ट इंडिजला पात्रता फेरीतून या स्पर्धेत जागा मिळवावी लागणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >