Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; दोन सख्ख्या भावांसह मामाचा जागीच मृत्यू, टेम्पोचालक पसार

बीड : बीड–शिरूर–पाथर्डी मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, हिवरसिंगा परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली. या अपघातात दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पसार झाला. मंगळवारी उशिरा रात्री हा अपघात झाला. शिरूर कासार येथील मामा आणि बीड येथे राहणाऱ्या आपल्या दोन भाच्यांना दुचाकीवरून घेऊन जात असताना हिवरसिंगा परिसरात हा अपघात घडला. (Beed Accident News)



भरधाव टेम्पोने दुचाकीला उडवले


मिळालेल्या माहितीनुसार, राम बाजीराव शेळके (वय 32, रा. शिरूर कासार) हे आपल्या दोन भाच्यांसोबत दुचाकीवरून बीडकडे जात होते. त्याचवेळी बीडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील राम शेळके यांच्यासह मंगेश रोहिदास बजगुडे (वय 19) आणि गणेश रोहिदास बजगुडे (वय 21, दोघे रा. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरू आहे. (Beed Accident News)



दोन तरुण मुलांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा


या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बजगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राम शेळके यांचा मृतदेह शिरूर येथे आणण्यात आला. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन तरुण मुलांना गमावल्याने त्यांच्या आई-वडिलांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (Beed Accident News)



वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


या अपघातामुळे बीड–शिरूर–पाथर्डी मार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; आज कुठे पावसाची शक्यता? जाणून घ्या हवामान अपडेट

 Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली असून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. 1

Aadhaar Card News: उद्यापासून सर्व प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड बंधनकारक, वाचा सविस्तर...

मुंबई: स्थावर मालमत्तेशी संबंधित दस्तनोंदणीतील फसवणुकीला आळा घालण्यासाठी आता कोणत्याही दस्त नोंदणीसाठी

MPSC विद्यार्थ्यांचे 2 ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी पुण्यात आंदोलन

शक्तीपीठ महामार्गासाठी १२९ गावांत जमीन मोजणी पूर्ण, ४०९ गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया; २६५ गावांत शेतकऱ्यांशी संवाद सुरू

मुंबई : शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी असलेल्या संयुक्त जमीन मोजणीला १३

माजी अग्निवीरांना राज्यातील गणवेशधारी पदांसाठी विविध सवलती - लेखी, शारीरिक चाचण्यांतून सूट; वयोमर्यादेत चार वर्षांपर्यंत शिथिलता

मुंबई : सैन्यदलातील चार वर्षांची सेवा पूर्ण करून सेवामुक्त होणाऱ्या महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना

Gulabrao Patil : राज्यात तीन टप्प्यांत पाणीटंचाईचे नियोजन, १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्हानिहाय आराखडा सादर करण्याचे निर्देश

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य टंचाईचा