Stay on loan recovery : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती

- पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश; ३० एप्रिल २०२७पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बँकांना सूचना

 

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश देण्यात आले असून, ही प्रक्रिया ३० एप्रिल २०२७पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना बँकांना करण्यात आल्या आहेत. पुढील खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

 

यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने सुरुवातीला २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर आणखी ४३ तालुक्यांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी कर्जवसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Stay on loan recovery)

 

दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जाऊ नये, याबाबत महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सूचना दिल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या दारी बँक किंवा पतसंस्थेचा कर्मचारी वसुलीसाठी जाता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

 




रोजगार हमीच्या माध्यमातून हाताला काम देणार


 

  • दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि शेतमजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाने ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून सिंचनाची कामे, गायगोठे, वैयक्तिक फळबाग लागवड, बोअरवेल पुनर्भरण, बांबू लागवड, प्रधानमंत्री आवास योजना, रेशीम उद्योगासाठी शेड, बांधकाम, कंपोस्ट खड्डे आणि सार्वजनिक तलावांची दुरुस्ती यांसारखी कामे हाती घेण्यात येणार आहेत.

  • दुष्काळाच्या काळात रोजगाराबरोबरच जलसंधारण आणि ग्रामीण भागातील कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करण्यावर या कामांतून भर देण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि शेतमजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पाणी उपलब्धतेच्या दृष्टीनेही कामे करण्याचे नियोजन आहे. (Stay on loan recovery)

Comments
Add Comment

Parth Pawar : ९९ टक्के भागीदारी असतानाही मुंढवा जमीनप्रकरणात पार्थ पवार आरोपी का नाहीत?

- उच्च न्यायालयाचा सवाल; पुढील तपासाचे डीजीपी करणार निरीक्षण मुंबई : पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर सरकारी जमीन

Tukaram Mundhe: 'आधी स्वतःच्या मुलांना खायला द्या' पान मसाल्यांची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर तुकाराम मुंढेंचा संताप

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रभर कारवायांचा धडाका लावला आहे. दूधभेसळ,

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; दोन सख्ख्या भावांसह मामाचा जागीच मृत्यू, टेम्पोचालक पसार

बीड : बीड–शिरूर–पाथर्डी मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, हिवरसिंगा परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; आज कुठे पावसाची शक्यता? जाणून घ्या हवामान अपडेट

 Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली असून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. 1

Aadhaar Card News: उद्यापासून सर्व प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड बंधनकारक, वाचा सविस्तर...

मुंबई: स्थावर मालमत्तेशी संबंधित दस्तनोंदणीतील फसवणुकीला आळा घालण्यासाठी आता कोणत्याही दस्त नोंदणीसाठी

MPSC विद्यार्थ्यांचे 2 ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी पुण्यात आंदोलन