Thane Ganesh Idol Photo Ban: विसर्जित गणेशमूर्तींच्या छायाचित्रणावर ठाणे पोलिसांची बंदी; निर्णयाविरोधात पर्यावरण कार्यकर्ते न्यायालयात

ठाणे: यंदाचा गणेशोत्सव हा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत दरवर्षीप्रमाणे थाटामाटात साजरा झाला. परंतु विसर्जनानंतर अर्धवट विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती या किनाऱ्यावर वाहून येतात किंवा पाण्यासोबत तरंगत असतात. या तरंगणाऱ्या मूर्तींचे छायाचित्र काढण्यावर, ते प्रसिद्ध करण्यावर आता ठाणे पोलिसांनी सक्त मनाई केली आहे. यासंदर्भातील आदेश ठाणे पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. परंतु या आदेशाला पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी आव्हान दिलं आहे. तसेच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. (Thane Ganesh Idol Photo Ban)



११ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत विसर्जित गणेशमूर्तींचे छायाचित्र काढण्यावर मनाई करणारा आदेश ठाणे पोलिसांकडून देण्यात आला. या आदेशानुसार अर्धवट विसर्जन झालेल्या गणेश मूर्तींचे छायाचित्र काढण्यास तसेच मूर्ती गोळा करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचे छायाचित्रण करण्यास आणि ते प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत हा आदेश लागू करण्यात आलेला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या आदेशानुसार, असे फोटोज प्रसारित केल्याने धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कारवाई होऊ शकते.


ठाणे पोलिसांच्या या आदेशाला रोहित जोशी यांनी आव्हान दिले असून याप्रकरणी त्यांनी न्यायालय अवमानाची नोटीस बजावली आहे. जोशी यांच्या म्हणण्यानुसार, मूर्तींच्या छायाचित्रणावरील बंदीमुळे पर्यावरणीय संरक्षणासाठी, न्यायालयीन कार्यवाहीसाठी अडथळे येऊ शकतात. जलस्रोतांची वास्तविक स्थिती पालिका प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या छायाचित्रांचा पुराव्यासाठी उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या आदेशात कोणालाही वैयक्तिक सूट दिली जाणार नसून रोहित जोशी यांना न्यायालयाकडून औपचारिक परवानगी घ्यावी लागेल, असे ठाणे पोलिसांनी सांगितले आहे. (Thane Ganesh Idol Photo Ban)

Comments
Add Comment

Stay on loan recovery : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती

- पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश; ३० एप्रिल २०२७पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बँकांना सूचना मुंबई :

Parth Pawar : ९९ टक्के भागीदारी असतानाही मुंढवा जमीनप्रकरणात पार्थ पवार आरोपी का नाहीत?

- उच्च न्यायालयाचा सवाल; पुढील तपासाचे डीजीपी करणार निरीक्षण मुंबई : पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर सरकारी जमीन

Tukaram Mundhe: 'आधी स्वतःच्या मुलांना खायला द्या' पान मसाल्यांची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर तुकाराम मुंढेंचा संताप

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रभर कारवायांचा धडाका लावला आहे. दूधभेसळ,

Nashik : नाशिकमध्ये देशातील पहिला पायलट प्रकल्प ! नाशिकच्या ITI विद्यार्थ्यांना रेल्वे ट्रॅक्शन लाईनचे विशेष प्रशिक्षण

Nashik : भारतीय रेल्वेच्या वेगाने सुरू असलेल्या विद्युतीकरणामुळे भविष्यात ओव्हरहेड ट्रॅक्शन लाईनच्या देखभाल आणि

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा उडवला धुव्वा

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती पार पडल्या. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश, तर

MLA Prasad Lad: आमदार प्रसाद लाड यांनी स्वीकारला महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीस पदाचा पदभार

मुंबई: कांदिवली येथील गेल्या ७० वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या मान्यताप्राप्त 'महिंद्रा अँड महिंद्रा