अभिनेत्री नुसरत भरुचा ही कामानिमित्त परदेशात असताना तिचा अपघात झाला. बाली येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते परंतु दुखापतीची तीव्रता स्पष्ट झाली नव्हती. नुसरतच्या अपघाताच्या वृत्ताने चाहते चिंतामग्न झाले होते. अशातच आता तिच्या तब्येतीची बातमी समोर आली आहे. बाली येथे झालेल्या भीषण अपघातात नुसरतच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे नुसरतला मणक्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Nushrratt Bharuccha Accident)
नुसरतच्या तब्येतीबद्दल अधिकृतपणे निवेदन करण्यात आले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे की 'नुसरत भरुचा कामाच्या आणि सुट्टीच्या निमित्ताने बालीला गेली होती तेव्हा तिचा एक दुर्दैवी अपघात झाला असून तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाले आहे.ती सध्या बालीमध्ये रुग्णालयात दाखल असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. डॉक्टरांकडून पुढील तपासणी झाल्यानंतर, नुसरतवर पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया केली जाईल.सध्या तिचे आरोग्य आणि तिला आवश्यक वैद्यकीय उपचार मिळणे हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तिला बालीहून मुंबईला 'एअर ॲम्ब्युलन्स'द्वारे परत आणण्याची आम्ही व्यवस्था करत आहोत; मुंबईतच तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल.'
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बाली येथे कामाच्या निमित्ताने गेली असता तिचा अपघात झाला ...
'दुखापत आणि शस्त्रक्रियेचे स्वरूप पाहता, नुसरतच्या प्रकृतीला आराम आणि सुधारणेसाठी वेळ लागेल; त्यामुळे पुढील काही आठवड्यांतील तिच्या कामाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या कठीण काळात तिच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि तिला तिच्या उपचारांवर व प्रकृती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक ती मोकळीक द्यावी, अशी आम्ही सर्वांना विनंती करतो. सर्वांनी दाखवलेली काळजी आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल आम्ही आभारी आहोत; योग्य वेळी आम्ही पुढील माहिती देऊ.' मुंबईत नुसरतवर उपचार होतील तोपर्यंत तिला तिचा वेळ द्यावा आणि तिच्या वेळेचा आदर करावा असे आवाहन या निवेदनात केले आहे.(Nushrratt Bharuccha Accident)
यापूर्वी देखील नुसरत किरकोळ अपघातांना सामोरी गेली आहे. २०२३ मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नुसरत संगमरवरी फरशीवरून पडली होती तर त्याच वर्षी 'छोरी २' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून टाके पडले होते. याआधी २०२१ मध्ये नुसरतची तब्येत बिघडली होती. तिचा ब्लड प्रेशर लो झाला होता आणि डॉक्टरांनी याला वर्टिगो अटैक असल्याचे सांगितले होते. नुसरत सोबत घडत असलेल्या या घटनांमागे तिचं मंदिरात जाणं आणि हिंदू देवतांची पूजा करणं हे कारण असल्याचा दावा ऑल इंडिया मुस्लिम जातीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी केला होता. यानंतर त्यांनी तिला माफी मागण्याचा आणि कलमा वाचण्याचा सल्ला दिला.




