Devendra Fadnavis : महाराष्ट्रात 8.5 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव; 3 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी

मुंबई : महाराष्ट्राला देशासह जागतिक स्तरावर गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना जमीन, वीज, पायाभूत सुविधा, विविध परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याला आवश्यक ते सहकार्य देण्याची जबाबदारी शासनाची असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मंत्री, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.



या उपक्रमांतर्गत 67 प्रस्तावित सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यातून 8.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच 3 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, अक्षय ऊर्जा, उत्पादन, एरोस्पेस, संरक्षण, आरोग्यसेवा आणि कृषीप्रक्रिया अशा विविध क्षेत्रांचा या प्रस्तावांमध्ये समावेश आहे.


या गुंतवणुकीचा फायदा केवळ मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित न राहता स्थानिक लघु आणि मध्यम उद्योग, पुरवठादार, युवक तसेच शेतकऱ्यांना मिळावा, यावरही मुख्यमंत्र्यांनी भर दिला. मोठ्या उद्योगांनी स्थानिक कंपन्यांना आपल्या पुरवठा साखळीत संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.


चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेशात गुंतवणुकीचे प्रस्ताव आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांत रोजगार आणि विकासाच्या संधी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.


2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी उद्योग, कौशल्य, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे.


Comments
Add Comment

आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगारात बुडून मृत्यू, आळंदीतील विनर्स अकादमीचा परवाना रद्द; कारण काय?

११ वी आणि १२ वी इयत्तेत शिकत असलेल्या८ अल्पवयीन मुलांचा दिवेआगर येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदी

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सप्तशृंग गडावर विशेष नियोजन ! गर्दी व्यवस्थापनासह वाहतूक, पार्किंग, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापनाचा मास्टर प्लॅन

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या संख्येने भाविक

दृश्यम चित्रपटात नवा ट्वीस्ट, आता 2 ऑक्टोबर नाही तर 23 जुलै! सोशल मीडियावर तारखेचा नवा ट्रेंड

भारतीय चित्रपट इतिहासात थरारक सिनेमा म्हणून दृश्यमची ख्याती आहे. मल्याळम चित्रपटाच्या कथानकावर बॉलिवूडमध्ये

Nashik : नाशिककरांना मोठा दिलासा ! मालमत्ता नाव बदलाच्या विलंब शुल्कात मोठी कपात

Nashik : मालमत्ता हस्तांतरणानंतर महापालिकेच्या करनोंदींमध्ये नाव बदलण्यास विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या

Fodder crisis in Nashik : नाशिकमध्ये चारा संकटाचे सावट, दुष्काळामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

Fodder crisis in Nashik : जिल्ह्यातील दहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतीपिकांसोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार होणार, सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यास शासनाची मान्यता

मुंबई: फिल्म सिटीचा आता आणखीन विस्तार होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार करण्यासाठी