Friday, October 2, 2026

October Movie Releases 2026 : ॲक्शन, हॉरर, कॉमेडी आणि रोमँटिक ड्रामाचा तडका ! ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये दृश्यम 3 सह 'या' 12 सिनेमांचा धमाका

October Movie Releases 2026 : ॲक्शन, हॉरर, कॉमेडी आणि रोमँटिक ड्रामाचा तडका ! ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये दृश्यम 3 सह 'या' 12 सिनेमांचा धमाका

October Movie Releases : ऑक्टोबर महिना सुरू झाला असून सिनेप्रेमींसाठी हा महिना मनोरंजनाची मोठी पर्वणी घेऊन आला आहे. बॉलिवूडपासून साऊथ इंडियन आणि हॉलिवूडपर्यंत अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट या महिन्यात मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहेत. ॲक्शन, थ्रिलर, हॉरर, कॉमेडी आणि रोमँटिक ड्रामा अशा विविध जॉनरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा प्लॅन असेल, तर ऑक्टोबरमधील हे आगामी रिलीज नक्की लक्षात ठेवा.

बॉलिवूडमध्ये कोणते सिनेमे होणार रिलीज ?

'दृश्यम 3' – 2 ऑक्टोबर

अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित *'दृश्यम 3'*कडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू आणि जयदीप अहलावत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे.

'प्रेम कीटाणु' – 2 ऑक्टोबर

कॉमेडी-ड्रामा असलेला 'प्रेम कीटाणु' देखील २ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. अपूर्व सिंह कार्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून वीर पहाडिया, आफिया सय्यद, अपारशक्ती खुराना, राकेश बेदी आणि निखिल विजय यांच्या भूमिका आहेत.

'उड़ता तीर' – 9 ऑक्टोबर

आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांचा स्पाय-कॉमेडी ड्रामा 'उड़ता तीर' ९ ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'नई नवेली' – 16 ऑक्टोबर

यामी गौतम 'नई नवेली' या चित्रपटातून कॉमेडीसोबत हॉररचा तडका देताना दिसणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्जवल निकम' – 16 ऑक्टोबर

उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी प्रमुख भूमिकेत आहेत. 'प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्जवल निकम' हा चित्रपट १६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

'पहला प्यार दूसरी बार' – 23 ऑक्टोबर

लव रंजन यांच्या दिग्दर्शनातील रोमँटिक-कॉमेडी ड्रामा 'पहला प्यार दूसरी बार' २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे. या चित्रपटातून काही नव्या कलाकारांना लॉन्च केले जात आहे.

'तुम मेरे हो' – 23 ऑक्टोबर

ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी यांचा रोमँटिक ड्रामा 'तुम मेरे हो' देखील २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशीष पांडा यांनी केले आहे.

साऊथ इंडियन सिनेमांचीही रंगत

'जेलर 2' – 15 ऑक्टोबर

सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर'चा बहुप्रतिक्षित सीक्वेल 'जेलर 2' ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

'विश्वंभरा' – 16 ऑक्टोबर

चिरंजीवी, त्रिशा कृष्णन आणि कुणाल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला तेलुगू चित्रपट 'विश्वंभरा' १६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

'रणबाली' – 16 ऑक्टोबर

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा पीरियड ॲक्शन ड्रामा 'रणबाली' १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हॉलिवूडमध्येही मोठे रिलीज

'स्ट्रीट फायटर' – 16 ऑक्टोबर

ॲक्शन-थ्रिलर 'स्ट्रीट फायटर' १६ ऑक्टोबरला भारतीय सिनेमागृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाकडून ॲक्शनप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहेत.

'क्लेफेस' – 23 ऑक्टोबर

हॉरर-थ्रिलर 'क्लेफेस' २३ ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात टॉम राइस हॅरिस, नाओमी अकी आणि डेव्हिड डेंसिक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ऑक्टोबर ठरणार सिनेरसिकांसाठी खास

ऑक्टोबरमध्ये बॉलिवूड, साऊथ इंडियन आणि हॉलिवूडमधील विविध धाटणीचे चित्रपट रिलीज होणार आहेत. ॲक्शनपासून हॉररपर्यंत आणि कॉमेडीपासून रोमँटिक ड्रामापर्यंत विविध पर्याय उपलब्ध असल्याने थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा महिना महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >