Friday, October 2, 2026

Drishyam 3 First Review : 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणार ? 'दृश्यम 3'चा फर्स्ट रिव्यू समोर

Drishyam 3 First Review : 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणार ? 'दृश्यम 3'चा फर्स्ट रिव्यू समोर

Drishyam 3 First Review : अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. आता चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला असून, सिनेमा समीक्षक आणि ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

तरण आदर्श यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ या चित्रपटाचे कौतुक करत त्याला 5 पैकी 4.5 स्टार्स दिले आहेत. त्यांच्या मते, हा चित्रपट ‘दृश्यम’ फ्रँचायझीतील अत्यंत प्रभावी भाग ठरू शकतो. विशेषतः अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्या अभिनयाची त्यांनी प्रशंसा केली आहे.

‘दृश्यम 3’ला 4.5 स्टार्स; तरण आदर्श काय म्हणाले ?

तरण आदर्श यांच्या रिव्ह्यूनुसार, ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हा अपेक्षांवर खरा उतरणारा सिनेमा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, फ्रँचायझीचा हा भाग कथेला पुढे घेऊन जातो आणि आधीच्या चित्रपटांतील सूत्रांची केवळ पुनरावृत्ती करत नाही. त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि लेखनाचेही कौतुक केले आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी फ्रँचायझीचा गाभा कायम ठेवत कथेला नवीन दिशा दिल्याचे मत तरण आदर्श यांनी व्यक्त केले आहे.

अजय देवगण आणि जयदीप अहलावतची टक्कर ठरली खास

चित्रपटातील अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यातील सामना हा विशेष आकर्षण ठरल्याचे तरण आदर्श यांनी आपल्या रिव्ह्यूमध्ये नमूद केले आहे. विशेषतः इंटरव्हलपूर्वीचे दोन्ही कलाकारांचे सीन्स प्रभावी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय कोर्टरूममधील प्रसंग आणि अजय देवगण, त्याचे कुटुंब तसेच प्रकाश राज यांच्यातील सुरुवातीचे सीन्सही लक्षवेधी असल्याचे त्यांच्या रिव्ह्यूमध्ये नमूद करण्यात आले आहे.

क्लायमॅक्सबाबतही मोठा दावा

‘दृश्यम 3’च्या क्लायमॅक्सबाबतही तरण आदर्श यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, चित्रपटाचा शेवट प्रभावी असून तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीमध्ये क्लायमॅक्सला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तिसऱ्या भागाचा शेवट कसा असेल, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तरण आदर्श यांच्या रिव्ह्यूमुळे या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकर या भूमिकेत दिसणार आहे. तरण आदर्श यांच्या मते, अजय देवगण हा या फ्रँचायझीचा महत्त्वाचा आधार असून त्यांनी या भूमिकेतील भावनिक आणि आव्हानात्मक पैलू प्रभावीपणे साकारले आहेत. विशेषतः जयदीप अहलावतसोबतचा इंटरव्हलपूर्वीचा सामना हा चित्रपटातील महत्त्वाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बॉक्स ऑफिसवरही मोठ्या कमाईची अपेक्षा ?

‘दृश्यम 3’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसाद आणि आता समोर आलेला सकारात्मक रिव्ह्यू यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, प्रत्यक्ष कमाईचा अंदाज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, तरण आदर्श यांच्या 4.5 स्टार्सच्या रिव्ह्यूमुळे अजय देवगणच्या चाहत्यांमध्ये ‘दृश्यम 3’बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता प्रेक्षक चित्रपटाला थिएटरमध्ये कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >