Saturday, October 3, 2026

Dhule Crime News : धुळे हादरले ! आधी महिलेला ब्लॅकमेल केलं, नंतर संतापजनक कृत्य... ; तीन नराधम ताब्यात

Dhule Crime News : धुळे हादरले ! आधी महिलेला ब्लॅकमेल केलं, नंतर संतापजनक कृत्य... ; तीन नराधम ताब्यात

Dhule Crime News : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या (Azad Nagar Police Station) हद्दीत महिलेला धमकावत आणि ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 80 फुटी रोड परिसरातील या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, या प्रकरणात तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

धुळ्यात नेमकं काय घडलं ?

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेला विविध प्रकारे धमकावून आणि ब्लॅकमेल करून तिच्यासोबत अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिसांनी (Azad Nagar Police Station) तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या पथकाने परिसरात चौकशी करत या प्रकरणातील तीन संशयितांना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले.

तीन संशयितांची पोलिसांकडून चौकशी

शुक्रवारी रात्री आझाद नगर पोलीस ठाण्यात (Azad Nagar Police Station) ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणामागे नेमकं कारण काय? महिलेला कशाप्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं ? तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील तक्रार आणि तपासाच्या आधारे नेमकी कोणती कायदेशीर कलमे लागू केली जातात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासातून या घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे. या प्रकरणातील संशयितांची सखोल चौकशी करून कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी या घटनेबाबत सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अपुऱ्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील अधिकृत तक्रार, गुन्ह्याची कलमे आणि तपासातून समोर येणारी माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >