Friday, October 2, 2026

महाराष्ट्रात कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका; राज्य शासनाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका; राज्य शासनाचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका मिळवणे आता कॅब बुक करण्याइतके सोपे होणार आहे. राज्य परिवहन आणि आरोग्य विभागाकडून एका नाविन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम सुरू असून, याद्वारे नागरिक मोबाईल ॲप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या सर्वात जवळ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका सहज शोधू आणि बुक करू शकतील.

प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • थेट स्थान आणि माहिती: या प्रस्तावित प्लॅटफॉर्मवर रुग्णवाहिकेचे लाईव्ह लोकेशन (थेट स्थान), पोहोचण्याची अंदाजित वेळ (ETA) आणि प्रवासाचे सेवा शुल्क स्पष्टपणे दाखवले जाईल.

  • आरोग्य आणि परिवहन विभागाचा संयुक्त उपक्रम: विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTOs) नोंदणीकृत असणाऱ्या सर्व रुग्णवाहिकांचे तपशील या प्रणालीशी जोडले जातील.

  • खाजगी चालकांचा सहभाग: खाजगी रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालयांनाही या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे नियोजन असून, त्यांच्यासाठी किमान वैद्यकीय सुविधा आणि मानके बंधनकारक केली जाऊ शकतात.

अपघाताच्या 'गोल्डन अवर'वर विशेष भर

रस्ते अपघाताच्या वेळी वेळेवर मदत न मिळाल्यामुळे अनेकदा जीव गमावावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी ही यंत्रणा अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच 'गोल्डन अवर' लक्षात घेऊन विकसित केली जात आहे. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यास रुग्णाच्या जगण्याची शक्यता कैक पटीने वाढते. सध्या नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी विविध हेल्पलाइन किंवा वैयक्तिक चालकांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन वारंवार फोन करण्याची कटकट संपणार आहे. तसेच प्रवासादरम्यान रुग्णाला प्राथमिक उपचारांची सुविधा मिळावी, यासाठी डॉक्टर व परिचारिकांच्या उपलब्धतेवरही विचार सुरू आहे. हा प्रस्ताव सध्या नियोजन टप्प्यात असून लवकरच याची सविस्तर कार्यपद्धती जाहीर केली जाईल.(Ambulance Booking Maharashtra)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >