Saturday, October 3, 2026

Navratri 2026: यंदा दांडिया-गरबासाठी वेळेचे निर्बंध, कसे असेल वेळापत्रक

Navratri 2026: यंदा दांडिया-गरबासाठी वेळेचे निर्बंध, कसे असेल वेळापत्रक
मुंबई: नवरात्रौत्सव (Navratri) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वांनाच आता गरबा-दांडीयाचे (garba in Navratri) वेध लागलेत. अशातच नवरात्रौत्सवात यंदा गरबा रंगला, तरी त्याला वेळेचे बंधन किती असेल? या बाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे. या संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. नवरात्रीच्या दिवसांमध्ये आयोजकांना वेळेचं बंधन पाळावे लागणार आहे. त्यामुळे रसिकांसह आयोजकांचाही हिरमोड झाला आहे. किती वाजेपर्यंत रसिकांना गरबा खेळता येणार आहे, जाणून घेऊया...
यंदा दांडिया-गरबासाठी वेळेचे निर्बंध असणार आहे. नवरात्रीतील नऊ दिवस रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळता येणार नाही. फक्त 19 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे. शनिवार-रविवार मध्यरात्रीपर्यंत सुद्धा महाराष्ट्र शासनाने परवानगी नाकारल्याने दांडिया- गरबा रसिक नाराज झाले आहेत. दांडिया- गरबा रसिकांना यामुळे झटका बसला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >