Saturday, October 3, 2026

Mumbai Tour: भाजपा मुंबईच्या वतीने ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्सना मुंबईच्या विकासकामांची मिळणार माहिती

Mumbai Tour: भाजपा मुंबईच्या वतीने ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्सना मुंबईच्या विकासकामांची मिळणार माहिती

मुंबई: भाजपा मुंबईच्या वतीने उद्या ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’ करण्यात येणार आहे. या टूरच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. उद्या होणाऱ्या ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’ दरम्यान भाजपा मुंबईच्या वतीने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि डिजीटल माध्यमांच्या प्रतिनिधींना मुंबईच्या विकासकामांची प्रत्यक्ष माहिती देण्यात येणार आहे. मुंबई शहरामध्ये करण्यात आलेले विकासकामं संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहता येणार आहे.

सेवा संकल्प अभियान आणि ‘विकसित भारत @ 2047’या संकल्पनेंतर्गत भाजपा मुंबईच्या वतीने उद्या, रविवार, 4 ऑक्टोबर रोजी टूरचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या विशेष दौऱ्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींना मुंबईतील विविध विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेता येणार आहे. सकाळी १० वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी येथून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मुंबईतील प्रमुख पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर तसेच अन्य महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची माहिती सहभागी प्रतिनिधींना या दौऱ्यात देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या विविध विकासकामांचा प्रवास सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याचा वरळी प्रोमेनेड येथे समारोप होणार असून, त्यानंतर भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्यासोबत विशेष टॉक शो आणि संवाद आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील विकासकामे, त्यांचा नागरिकांना होणारा लाभ तसेच मुंबईच्या भविष्यातील विकासाच्या दिशेबाबत यावेळी संवाद साधला जाणार आहे. मुंबईच्या विकासाचा प्रवास प्रत्यक्ष अनुभवून तो डिजिटल माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची संधी या विशेष ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >