Nashik Crime News : नाशिक शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने पंचवटीतील नवनाथनगर परिसरात ही कारवाई केली. दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नावे बदलून नाशिकात वास्तव्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
गुन्हे शाखा युनिट-1 चे हवालदार प्रवीण वाघमारे आणि विशाल देवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत नवनाथनगर परिसरात काही बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी नवनाथनगर परिसरातील शिंदे चाळीत छापा टाकला. यावेळी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव समोर आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बाळाचा मृत्यू ...
नाव बदलून नाशिकात वास्तव्य केल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयितांची मूळ नावे मोहम्मद मुशर्रफ हुसेन मुजीर्बुरहमान खोकन आणि मोहम्मद सज्जत हुसेन आशिक अशी आहेत. दोघेही बांगलादेशातील नोवाखाली जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिकात मात्र ते अनुक्रमे रोनी अब्दुल शेख (32) आणि आशिक अलीअकबर अन्सारी (22) या नावाने राहत असल्याचे तपासात समोर आले आहे.
घरझडतीत पासपोर्ट, मतदान कार्डसह कागदपत्रे
पोलिसांनी संशयितांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्वाशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे पासपोर्ट, मतदान कार्ड आणि इतर कागदपत्रे आढळली. तसेच, त्यांच्याकडे आढळलेले आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनावट असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांकडे भारतात प्रवेश करण्यासाठी आवश्यक वैध प्रवासी कागदपत्रे आढळून आली नसल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीत संशयितांनी भारत-बांगलादेश सीमेवरून अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यानंतर दोघांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Dhule Crime News : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या (Azad Nagar Police Station) हद्दीत महिलेला धमकावत आणि ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला ...
घुसखोरीमागे मोठे रॅकेट आहे का ?
या प्रकरणामुळे नाशिकमध्ये अवैधरित्या नागरिकांना आणून त्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करण्यास मदत करणारे नेटवर्क कार्यरत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून, त्या दिशेने गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. संशयितांना मदत करणाऱ्या व्यक्तींसह संबंधित घरमालकाचीही चौकशी केली जात आहे. तपासात आणखी कोणाची नावे समोर येतात आणि या प्रकरणामागे नेमके कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रेय पोटे, रमीज शेख, राम शिंदे, किरण शिरसाठ, जमादार कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, राजेश लोखंडे, हवालदार देविदास ठाकरे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, रवींद्र आढाव, महेश साळुंके, संदिप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी आदींच्या पथकाने केली.





