Sunday, October 4, 2026

Asian Games 2026 : भारताचा विजयाचा डंका! २१ सुवर्णपदकांसह मिळवली एकूण ८५ पदके

Asian Games 2026 : भारताचा विजयाचा डंका! २१ सुवर्णपदकांसह मिळवली एकूण ८५ पदके

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ आज समाप्त झाली असून भारताने यावर्षी विजयाचा डंका वाजवलाय. एकूण ८५ पदकं भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आणि ताकदीने जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. चीन आणि जपान अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असून दक्षिण कोरिया या तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुरुषांच्या हॉकीच्या खेळाने या स्पर्धेचा शेवट झाला, ज्यात भारताला सुवर्णपदक मिळाले. यावर्षीच्या स्पर्धेतील भारताचे हे २१ वे सुवर्णपदक होते. ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. भारताने कोणत्या स्पर्धांमध्ये कोणते पदक मिळवले जाणून घेऊ.

भारताने 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य अशी एकूण 85 पदके मिळवली. भारताची आशियाई स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. पहिली कामगिरी ही 2023 चीन येथील हांगझोऊ येथे एकूण 107 पदके मिळवत केली होती. त्यावेळी देखील भारत चौथ्या क्रमांकावर होता. भारताला सर्वाधिक पदके ही ॲथलेटिक्स स्पर्धेत मिळाली. 1 सुवर्ण, 9 रौप्य, 14 कांस्य अशी एकूण २४ पदके ॲथलेटिक्समध्ये मिळाली. तर सर्वाधिक सुवर्ण पदके तिरंदाजीमध्ये (5) मिळाली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेली सुवर्णपदके -

  • क्रिकेट (पुरुष) - अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 19 धावांनी विजय
  • क्रिकेट (महिला) - श्रीलंकेवर 147 धावांनी विजय, विजेतेपद कायम
  • हॉकी (पुरुष) - मलेशियावर 5-1 ने विजय, विजेतेपद कायम
  • हॉकी (महिला) - 44 वर्षांनंतर पहिले सुवर्ण
  • कबड्डी - पुरुष व महिला दोन्ही संघांना सुवर्ण
  • कुस्ती - अमन सेहरावत (पुरुष 57 किलो) - या गटात सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय
  • बॉक्सिंग - लवलिना बोरगोहेन (महिला 75 किलो), अंकुश पंघाल (पुरुष 80 किलो)
  • नेमबाजी - कमलजीत व सुरुची सिंग (10 मी एअर पिस्तूल मिश्र संघ)
  • महिला 4x400 मी रिले - किरण पहल, पूवम्मा मचेत्तिरा, प्राची, विथ्या रामराज

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेली रौप्यपदके - 

  • तिरंदाजी - 2
  • शूटिंग - 8
  • कुस्ती - 2
  • ॲथलेटिक्स - 9
  • गोल्फ - 1
  • स्क्वॅश - 2
  • नौकानयन - 1
  • वजन उचलणे - 1
  • वुशू - 1

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेली कांस्यपदके -

  • तिरंदाजी - 2
  • शूटिंग - 4
  • बॉक्सिंग - 3
  • कुस्ती - 2
  • ॲथलेटिक्स - 14
  • स्क्वॅश - 3
  • नौकानयन - 2
  • बॅडमिंटन - 1
  • कुरश - 1
  • मार्शल आर्ट्स - 1
  • रोइंग - 1
  • सेपाक्ताक्रॉ - 1
  • सॉफ्ट टेनिस -1
  • टेबल टेनिस - 1
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >