मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर या पाचही मतदारसंघांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबतच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने लढती बहुरंगी झाल्या आहेत. 9 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप, शिवसेना आणि ...
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यासोबत शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन सानप यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबत अतिरिक्त उमेदवारांमुळे मतविभाजनाचे समीकरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव मैदानात आहेत. माजी आमदार दत्ता सावंत यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने भाजपसमोर बंडखोरी थोपवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नितेश कराळे आणि संजय थुल यांनीही अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
मुंबई : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला ...
अमरावतीत बहुकोनी लढत
अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या अदिती पोहरे, उबाठा गटाचे दत्तात्रय लहाने आणि शिवसेनेचे किरण सरनाईक हे प्रमुख उमेदवार आहेत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू आणि शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. युवा स्वाभिमान संघटनेच्या प्रीती रेवणे यांच्यासह अन्य उमेदवारही रिंगणात आहेत. भाजपशी संबंधित शेखर भोयर, सुमित पवार, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अनेक दावेदारांमुळे लढत बहुकोनी झाली आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. ...
संभाजीनगरमध्येही अतिरिक्त उमेदवार
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि उबाठा गटाचे दिलीप घुगे यांच्यात प्रमुख सामना आहे. भाजपचे नेते एम. के. देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनीही अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील समीकरणेही बहुरंगी झाली आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर माघारीच्या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. 9 ऑक्टोबरनंतर पाचही मतदारसंघांतील अंतिम उमेदवार स्पष्ट होतील. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात थेट लढत राहते आणि कुठे बंडखोर व अपक्ष उमेदवार रिंगणात कायम राहतात, हे स्पष्ट होणार आहे.