दुष्काळावर उपाययोजना सुचवण्यासाठी अभ्यासगट

मुंबई : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मंगळवारी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.


अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी यापूर्वी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने आता अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे.



महसुल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या अभ्यासगटात वित्त, नियोजन, ऊर्जा, वने या विभागांचे अपर मुख्य सचिव सदस्य आहेत. तसेच मदत व पुनर्वसन, सहकार, मृद व जलसंधारण आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव हेदेखील या अभ्यासगटात सदस्य असतील. तर, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे सचिव हे सदस्य आणि पदुम विभागाचे सचिव हे या अभ्यासगटात सदस्य सचिव असतील.


दुष्काळजन्य परिस्थतीवर मात करण्यासाठी आपल्या राज्यात तसेच इतर राज्यात यापुर्वी केलेल्या चांगल्या उपाययोजनांचा अभ्यास करुन उपाययोजना सुचविणे, उपलब्ध चारा व संभाव्य उत्पादन करण्यात येणारा चारा आणि पुढील काळात आवश्यक चारा विचारात घेऊन चारा नियोजन करणे तसेच इतर अनुषांगिक बाबींचा अभ्यास करुन उपाययोजना सुचविण्याचे काम या अभ्यासगटाचे असेल.

Comments
Add Comment

पोलीस दल ते शिक्षण क्षेत्र... राज्य शासनाचे विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (६ ऑक्टोबर)

Devendra Fadnavis : ‘एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट’ प्रकारची सत्ता देशात आणण्याचा विरोधकांचा डाव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

भारतातील सर्व लोकशाही संस्था संपविण्याचे षड्यंत्र मुंबई : "काँग्रेस आणि त्यांच्या

Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनो, स्थगितीचा काळ मराठी शिकण्यासाठी वापरा; 18 ऑगस्ट 2027 नंतर नियमांची अंमलबजावणी

मुंबई : महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि

दुष्काळाच्या यादीत आणखी १९ तालुके; फेरविचाराचे आदेश

मुंबई : राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना, आधी दुष्काळ जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांव्यतिरिक्त

परराज्यातील वाहनांवर आरटीओचा धडक मोर्चा, 5 ते 17 ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम

नाशिक : परराज्यातून आणलेली खासगी वाहने महाराष्ट्रात विनानोंदणी वर्षानुवर्षे वापरणाऱ्या वाहनमालकांची आता खैर

Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीचा पाऊस पुन्हा बरसणार? 'या' जिल्ह्यांना दिला अलर्ट; जाणून घ्या 6 ऑक्टोबरचे हवामान

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात अनेक भागांत पावसाची तूट जाणवली. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला