शेवटच्या क्षणी रेल्वेने प्रवास करताय, पण तिकीट मिळत नाही? रेल्वेच्या 'या' सेवेमुळे मिळणार कन्फर्म तिकीट

शेवटच्या क्षणी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना तात्काळ तिकीट चुकली किंवा रेल्वेचा चार्ट तयार झाल्यावर आपल्याला आता तिकीट मिळणारच नाही असं वाटणं साहजिक आहे. पण रेल्वेच्या या सुविधेमुळे आता ऐनवेळी तिकीट मिळणं देखील शक्य झालं आहे.

शेवटच्या क्षणी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना तात्काळ तिकीट चुकली किंवा रेल्वेचा चार्ट तयार झाल्यावर आपल्याला आता तिकीट मिळणारच नाही असं वाटणं साहजिक आहे. पण रेल्वेच्या या सुविधेमुळे आता ऐनवेळी तिकीट मिळणं देखील शक्य झालं आहे. सणासुदीचे दिवस असले किंवा लॉँग विकेंड असला की बाहेर जाण्यासाठी एक्सप्रेस ट्रेनची तिकीट काढणं म्हणजे कसरतच असते. वेटिंग लिस्टमध्ये नाव आलं की तिकीट कन्फर्म कधी होतेय याचं टेन्शन. त्यात चार्ट तयार झाल्यावर आता आपली तिकीट कन्फर्म होणारच नाही असंच वाटत असतं. पण रेल्वेने प्रवाशांसाठी दिलेल्या 'करंट बुकिंग' या पर्यायामुळे प्रवासी शेवटच्या क्षणी देखील कन्फर्म तिकीट मिळवू शकतात.


करंट बुकिंगमुळे प्रवाशांना चार्ट तयार झाल्यानंतर RAC किंवा वेटिंग नाही तर कन्फर्म तिकीट मिळण्याची १०० टक्के खात्री आहे. आयआरसीटीसीची करंट बुकिंग ही सुविधा प्रवाशांना आरक्षण तक्ता तयार झाल्यानंतर निश्चित झालेल्या रिक्त जागा बुक करण्याची परवानगी देते. 'चार्ट्स व्हॅकंट या सुविधेद्वारे उपलब्ध असलेली ही सेवा प्रवाशांना सीटची उपलब्धता तपासण्याची आणि जागा उपलब्ध असल्यास बुक करण्याची सुविधा देते.






करंट बुकिंग कसे करता येते?


पहिला आरक्षण तक्ता हा ट्रेनच्या वेळेच्या चार तास आधी तयार होतो. आरक्षण तक्ता तयार झाल्यावरदेखील काही जागा या रिक्त राहू शकतात. या जागा करंट बुकिंगद्वारे प्रवाशांना दिल्या जाऊ शकतात. ट्रेन सुटण्याच्या ५ मिनिटे आधीपर्यंत प्रवाशांना या रिक्त जागा आरक्षित करता येऊ शकतात. विशेष म्हणजे या तिकीट कन्फर्म तिकीट म्हणूनच प्रवाशांना मिळतात. विशेष म्हणजे, तात्काळ किंवा प्रीमियम तात्काळ तिकीटसाठी लागणार अतिरिक्त भाडे या बुकींगवर लागू होत नाही. तसेच काही गाड्यांच्या बाबतीत IRCTC या तिकिटावर १० ते १५ टक्के सूटदेखील देऊ शकते.


तिकीट तपासण्याच्या पायऱ्या -


१) IRCTC वेबसाईट किंवा ॲपवर लॉग इन करा.
२) ट्रेन संबंधित सेवांखालील चार्ट्स व्हॅकंट या पर्यायावर जा.
३) उपलब्ध डबे आणि जागा पाहण्यासाठी ट्रेन नंबर आणि तारीख टाका.
४) कोच आणि बदलेल्या रिकाम्या जागा तपासा.
५) जागा उपलब्ध असल्यास वेबसाईट किंवा ॲपद्वारे बुकिंग करा.

Comments
Add Comment

Kartiki Ekadashi Wishes: कार्तिकी एकादशीच्या 6 खास शुभेच्छा! विठुरायाच्या भक्तीत रंगून जा, प्रियजनांना पाठवा मंगलमय संदेश

[caption id="attachment_1077073" align="alignnone" width="800"] विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, शांती आणि समृद्धी लाभो! कार्तिकी एकादशीच्या हार्दिक

Kartiki Ekadashi 2026 Dadar: कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये भक्तीचा जागर! 21 नोव्हेंबरला भव्य दिंडी सोहळा रंगणार

मुंबई: कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील दादर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे.

International Men's Day : पुरुषांच्या चेहऱ्यावर दिसणारा थकवा, 'या' ५ सवयी ठरू शकतात कारण

आज १९ नोव्हेंबर, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. समाजात पुरुष म्हटला की तो कणखर, कधीही न थकणारा असाच समज असतो. पण या

Aadhaar Card : आधार कार्डचा वापर कुठे झाला? घरबसल्या तपासा 6 महिन्यांची हिस्ट्री; अनोळखी व्यवहार दिसल्यास 'हे' काम करा!

जुने सोन्याचे दागिने विकण्यापूर्वी सावधान ! ज्वेलर्सकडून योग्य किंमत मिळवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

अचानक पैशांची गरज भासली किंवा एखादा मोठा खर्च समोर आला, तर घरातील जुने सोन्याचे दागिने विकून पैसे उभे करणे हा

Winter Clothes Care Tips : हिवाळ्यात स्वेटर आणि गरम कपड्यांना येतोय कुबट वास ? धुण्याआधी करा हे 3 सोपे उपाय, कपडे राहतील फ्रेश

Winter Clothes Care Tips : हिवाळ्याची चाहूल लागताच कपाटातून स्वेटर, जॅकेट, शाल आणि इतर उबदार कपडे बाहेर काढले