परराज्यातील वाहनांवर आरटीओचा धडक मोर्चा, 5 ते 17 ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम

नाशिक : परराज्यातून आणलेली खासगी वाहने महाराष्ट्रात विनानोंदणी वर्षानुवर्षे वापरणाऱ्या वाहनमालकांची आता खैर नाही. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ५ ते १७ ऑक्टोबर २०२६दरम्यान विशेष धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान महाराष्ट्रात दीर्घकाळ वापरल्या जाणाऱ्या परराज्यातील क्रमांकाच्या खासगी वाहनांची नोंदणी, महाराष्ट्रातील वापराचा कालावधी, मोटार वाहन कर भरणा आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.



वर्षभरापेक्षा जास्त वापरल्यास पुनर्नोंदणी बंधनकारक


मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ४७ नुसार, एका राज्यात नोंदणीकृत वाहन दुसऱ्या राज्यात सलग एक वर्षापेक्षा अधिक काळ वापरले जात असल्यास त्या राज्यात वाहनाची पुनर्नोंदणी करणे आणि विहित मोटार वाहन कर भरणे बंधनकारक आहे. तसेच, महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५४ नुसार, परराज्यातून महाराष्ट्रात आणलेल्या वाहनाची माहिती स्थानिक नोंदणी प्राधिकरणाला सात दिवसांच्या आत विहित नमुन्यात म्हणजेच फॉर्म एफ.टी. मध्ये सादर करणे आवश्यक आहे. मात्र, परराज्यातून वाहने खरेदी करून तेथील नोंदणी क्रमांक कायम ठेवत महाराष्ट्रात अनेक वर्षे वाहनांचा वापर केला जात असल्याचे प्रकार आरटीओच्या निदर्शनास आले आहेत.



शासनाच्या महसुलाचे नुकसान


परराज्यातील वाहनांचा महाराष्ट्रात दीर्घकाळ वापर करूनही नियमानुसार पुनर्नोंदणी आणि मोटार वाहन कर न भरल्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने अशा वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार ५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान परराज्यात नोंदणीकृत खासगी वाहनांची विशेष तपासणी करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके यांनी दिली.



नियमभंग केल्यास वाहन जप्तीचीही कारवाई


तपासणीदरम्यान वाहनाची नोंदणी, महाराष्ट्रातील वापराचा कालावधी, कर भरणा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गंभीर प्रकरणांमध्ये वाहन जप्त करण्याची कारवाईही केली जाऊ शकते. परराज्यातील वाहन महाराष्ट्रात दीर्घकाळ वापरणाऱ्या वाहनमालकांनी नियमानुसार वाहनाची पुनर्नोंदणी करून थकीत मोटार वाहन कर तातडीने भरावा, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. परराज्यातील नंबरवर वाहन चालवत असाल, तर कागदपत्रे आणि कराची पूर्तता तपासा; विशेष मोहिमेत नियमभंग आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीचा पाऊस पुन्हा बरसणार? 'या' जिल्ह्यांना दिला अलर्ट; जाणून घ्या 6 ऑक्टोबरचे हवामान

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात अनेक भागांत पावसाची तूट जाणवली. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला

Anganwadi protest : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 6 ऑक्टोबरचा संप मागे; आदिती तटकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत झालेल्या

Maharashtra Drought : महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक लवकरच राज्यात

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

Nitesh Rane: यवतमाळातील दुष्काळी परिस्थितीची नितेश राणे यांनी केली पाहणी, मच्छीमार बांधवांना मदतीची दिली ग्वाही

यवतमाळ: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मत्स्यव्यवसाय आणि बंदरे

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा कायम! पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे भेटीत काय घडलं?

मुंबई: विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील तिढा अद्याप कायम असल्याचे

Maharashtra Drought: दुष्काळी कामांसाठी आमदार निधीतून करणार मदत, टंचाई निवारणासाठी सरकारचा निर्णय

मुंबई: राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाईग्रस्त भागांमध्ये तातडीच्या उपाययोजना