International Men's Day : पुरुषांच्या चेहऱ्यावर दिसणारा थकवा, 'या' ५ सवयी ठरू शकतात कारण

१९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. कुटुंब आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अनेक पुरुष स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अपुरी झोप, तणाव, धूम्रपान, मद्यपान, चुकीचा आहार आणि कमी पाणी पिण्याच्या सवयींमुळे चेहऱ्यावर थकवा आणि वयाआधी वृद्धत्वाची लक्षणं दिसू शकतात. जाणून घ्या पुरुषांना वयाआधी थकवणाऱ्या ५ सवयी.

आज १९ नोव्हेंबर, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. समाजात पुरुष म्हटला की तो कणखर, कधीही न थकणारा असाच समज असतो. पण या कणखरपणाच्या आड त्याचं आरोग्य, त्याचा थकवा, त्याचं मानसिक दडपण याकडे कुणाचंच लक्ष जात नाही. स्वतःच्या कुटुंबासाठी राबणारा पुरुष हळूहळू स्वतःलाच विसरून जातो आणि हेच त्याच्या वयाआधी म्हातारं दिसण्याचं खरं कारण ठरतंय. पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. यंदाची थीम आहे - 'The Future Is Everyone'. म्हणजेच भविष्य हे सगळ्यांचं आहे. पुरुष आणि महिलांनी एकत्र येऊन समान संधी, सन्मान आणि सहकार्य असलेली दुनिया घडवावी, हा या थीममागचा संदेश आहे.


पुरुष वयाआधी थकलेले का दिसतात?


चेहरा निस्तेज होणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केस गळणं, सतत थकवा जाणवणं, ही लक्षणं अनेक पुरुषांमध्ये दिसतात. यामागे आपल्या रोजच्या काही सवयी कारणीभूत आहेत.


१. अपुरी झोप - झोप ही शरीराला नैसर्गिकरित्या आराम देणारी गोष्ट आहे. रोज नीट झोप झाली नाही तर त्वचा वेळेआधी म्हातारी दिसू लागते. डार्क सर्कल येतात. मोबाईलचा अतिवापर हेही एक कारण आहे. झोपेतच शरीर आणि त्वचा दुरुस्त होत असते.


२. ताणतणाव - नोकरी, घर, पैशाच्या अडचणींमुळे पुरुष सतत तणावात असतात. जास्त काळ तणाव राहिल्यास कोर्टिसोलसारख्या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो आणि व्यक्ती वयापेक्षा मोठी दिसू लागते.






३. धूम्रपान आणि दारू - महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये सिगारेट आणि दारूचं प्रमाण जास्त आहे. या दोन्ही गोष्टी केवळ जीवघेण्याच नाहीत, तर त्या व्यक्तीला वेळेआधी म्हातारं बनवतात. सिगारेटमधील हानिकारक रसायनांमुळे त्वचेतील रक्तप्रवाहावर परिणाम होतो.


४. चुकीचं खाणं - आहारात फळं, भाज्या आणि पोषक घटक नसतील तर त्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करतं, तर प्रोटीन शरीराच्या दुरुस्तीसाठी गरजेचं आहे. अनेक पुरुष रात्री उशिरा जेवतात, त्यामुळे पचन बिघडतं.


५. कमी पाणी पिणं - शरीरात पाणी कमी झालं की त्वचा कोरडी दिसू लागते. त्वचेच्या आरोग्यासाठी पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे.


पुरुष दिनानिमित्त केवळ शुभेच्छा देऊन न थांबता पुरुषांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Comments
Add Comment

Aadhaar Card : आधार कार्डचा वापर कुठे झाला? घरबसल्या तपासा 6 महिन्यांची हिस्ट्री; अनोळखी व्यवहार दिसल्यास 'हे' काम करा!

जुने सोन्याचे दागिने विकण्यापूर्वी सावधान ! ज्वेलर्सकडून योग्य किंमत मिळवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

अचानक पैशांची गरज भासली किंवा एखादा मोठा खर्च समोर आला, तर घरातील जुने सोन्याचे दागिने विकून पैसे उभे करणे हा

Winter Clothes Care Tips : हिवाळ्यात स्वेटर आणि गरम कपड्यांना येतोय कुबट वास ? धुण्याआधी करा हे 3 सोपे उपाय, कपडे राहतील फ्रेश

Winter Clothes Care Tips : हिवाळ्याची चाहूल लागताच कपाटातून स्वेटर, जॅकेट, शाल आणि इतर उबदार कपडे बाहेर काढले

Online shopping : ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली नवा स्कॅम ! ऑर्डर न करताच घरी येतंय पार्सल, ग्राहकांनी सावध राहण्याचं सायबर पोलिसांचं आवाहन

अकोला : ऑनलाइन खरेदीचा वाढता ट्रेंड पाहता सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

PM Suraksha Bima Yojana : वर्षाला फक्त 20 रुपयांत 2 लाखांचा अपघात विमा! प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

 PM Suraksha Bima Yojana : देशातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात अपघात विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र

Bread Poha Recipe: रोजचे पोहे-उपमा खाऊन कंटाळलात? एकदा ट्राय करा ब्रेड पोह्यांची भन्नाट रेसिपी!

Bread Poha Recipe: सकाळचा वेळ हा नोकरदार वर्गासाठी धावपळीचा असतो,अशावेळी झटपट पण तितकाच चवदार ऊर्जा टिकवून ठेवणारा नाश्ता