वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. खरं तर श्रेयस अय्यरने संघाची धुरा हाती घेतल्यावर भारतीय संघाची स्थिती नाजुक झाली होती. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका गमवावी लागली होती. त्यानंतर भारताने झिम्बाब्वे दौऱ्यात चमकदार कामगिरी केली. इतकंच काय तर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतही भारताने यश मिळवलं होतं. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका खेळण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेत श्रेयस अय्यरकडे एक मोठी संधी आहे. जर असं झालं तर कर्णधार म्हणून विराट आणि सूर्यकुमारला जे जमलं नाही ते त्याच्या नावावर होणार आहे. त्यामुळे विराट आणि सूर्यकुमारला जे जमलं नाही ते नेमकं काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चला जाणून घेऊयात..
श्रेयस अय्यर असं करू शकतो...
श्रेयस अय्यरकडे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत रोहित शर्माची बरोबरी करण्याची संधी आहे. टी20 क्रिकेटमध्ये सलग सामने जिंकणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर विक्रम आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 मध्ये सलग 11 टी20 सामन्यात भारताने विजय मिळवला होता. यापूर्वी 2019 ते 2022 दरम्यान आणखी एक विक्रम त्याच्या नावावर आहे. या दरम्यान भारताने सलग 14 टी20 सामने जिंकले होते. म्हणजेच भारताला सलग 10 किंवा त्याहून अधिक सामन्यात विजय मिळवून देण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. अशी कामगिरी त्याने दोन वेळा केली आहे. आता ही कामगिरी करण्याची संधी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वा भारतीय संघाकडे आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 2-1 विजय मिळवला असून आता टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. श्रेयस ...
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 9-9 सामने सलग जिंकले आहेत. विराट कोहलीने 2019 ते 2020 या कालावधीत हा विक्रम केला होता. तर सूर्यकुमार यादवने ही कामगिरी मागच्या वर्षी केली होती. श्रेयस अय्यर सध्या विराट आणि सूर्यकुमारसोबत एकाच पंगतीत बसला आहे. आता या दोघांना मागे टाकण्याची संधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला टी20 सामना जिंकला तर भारतासाठी सलग 10 टी20 सामने जिंकणारा रोहित शर्मानंतर दुसरा कर्णधार ठरेल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने वेस्ट इंडिजला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत क्लिन स्विप दिला तर सलग 14 सामने जिंकणाऱ्या रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी करेल. अशी कामगिरी करणारा दुसरा कर्णधार ठरेल. त्यामुळे या मालिकेत काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.